जपानमध्ये भूकंपाचा धक्का
By Admin | Updated: July 12, 2014 10:29 IST2014-07-12T10:29:00+5:302014-07-12T10:29:18+5:30
पूर्व जपानमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी मोजण्यात आली.

जपानमध्ये भूकंपाचा धक्का
>ऑनलाइन टीम
फुकुशिमा, दि. १२ - पूर्व जपानमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी मोजण्यात आली असून भूकंपामुळे छोटी त्सुनामीही निर्माण झाली होती. सुदैवाने या तो कोणतेही नुकसान झालेले नाही.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाजवळच हा भूकंपाचा धक्का बसला. यापूर्वी जपानच्या पूर्व किना-याजवळ झालेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. त्यात अणुउर्जा प्रकल्पाचेही नुकसान झाले होते. आजही याच ठिकाणी भूकंपाचा धक्का बसला, मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.