इटलीमध्ये भूकंप, 37 जण ठार तर 150 बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 16:07 IST2016-08-24T15:55:31+5:302016-08-24T16:07:05+5:30
मध्य इटलीत सकाळी झालेल्या भुकंपात 37 ठार तर 150 लोक बेपत्ता झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या भुकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल ऐवढी होती.

इटलीमध्ये भूकंप, 37 जण ठार तर 150 बेपत्ता
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 24 : मध्य इटलीत सकाळी झालेल्या भुकंपात 37 ठार तर 150 लोक बेपत्ता झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या भुकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल ऐवढी होती. यामुळे अनेक इमारतीची पडझड झाली असून मृतांचा आकड़ा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून ढिघाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
युरोपियन भूमध्य भूकंप केंद्राने हा भूकंप 6.1 रिश्टरस्केल तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने हा भूकंप ६.२ तीव्रतेचा म्हटले आहे.
दरम्यान, मध्य इटली आज पहाटे भूकंपाने हादरली. पहाटे 3.30 वाजता 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला . मृत्यूचा आकडा वाढतचं आहे. सकाळी आलेल्या वृत्तानुसार यामध्ये 6 जण ठारझाले होते. दुपारी तोच आकडा वाढून 27 वर गेला होता. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मृताचा आकडा 37 वर पोहचला आहे. तर 150 जण बेपत्ता आहेत.
रेयटी सह रोममध्येही भूकंपाचे तीव्र हदरले बसले. भूकंपानंतर रेयटी येथील नागरिक रस्त्यावर आले. तर अनेक इमारती कोसळल्याची माहिती रेयटीच्या महापौरांनी दिली आहे.