शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:20 IST

भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे.

वॉशिंग्टन - भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. तसेच या तुकड्यांमुळे  आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी धोक्याचा सामना करावा लागू, शकतो, अशी भीती नासाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या मिशन शक्ती चाचणीमुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला होता. दरम्यान, भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबत नासाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना  नासाचे प्रमुख जिम ब्रिडेंस्टाइन यांनी भारताने घेतलेल्या या चाचणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ''भारताच्या क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केलेल्या उपग्रहाचे सगळे तुकडे ट्रॅक करण्याइतपत मोठे नव्हते. सध्या आम्ही ज्या तुकड्यांचा मागोवा घेत आहोत. ते ट्रॅकिंगसाठी पुरेसे आहेत. आम्ही 10 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांबाबत बोलत आहोत. असे सुमारे 60 तुकडे ट्रॅक करण्यात आले आहेत.भारताने आपला 300 किमी उंचीवरील उपग्रह क्षेपणास्राचा मारा करून उद्ध्वस्त केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य महत्त्वाचे उपग्रह ते 300 किमीहून अधिक उंचीवर स्थित आहेत. असे जिम ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले. ''या स्फोटात विखुरलेले 24 तुकडे असे आहेत जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या एपोजीपासून वर जात आहेत. अवशेष एपोजीपासून वर जात असल्याने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अशा कृतींमुळे भविष्यात मानवाच्या अंतराळ स्वारीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही कृती स्वीकार्य नाही.'' असा इशाराही ब्रिडेंस्टाइन यांनी दिला. 

अमेरिकन सेना अंतराळातील प्रत्येक वस्तूवर लक्ष ठेवून असते. तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य उपग्रहांशी त्यांच्या होऊ शकणाऱ्या संभाव्य टक्करीबाबत इशारा देत असते. सध्या अंतराळात 10 सेंटीमीटरपेक्षा मोठे असलेले सुमारे 23 हजार तुकडे ट्रॅक झाले आहेत. त्यातील 10 हजार तुकडे हे अंतराळातील कचरा असून, 2007 मध्ये चीनने केलेल्या ASAT परीक्षणामुळे सुमारे 3 हजार तुकडे अंतराळात पसरले होते. चीनने हे परीक्षण 2007 मध्ये सुमारे 800 किमी उंचीवरा केले होते.  दरम्यान, ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले की, भारताने केलेल्या परीक्षणानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी असलेला टक्करीचा धोका गेल्या 10 दिवसांमध्ये 44 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र हे तुकडे जसजसे वातावरणात प्रवेश करताना जळून जातील तसतसा हा धोका कमी होईल. 

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीNASAनासाDRDOडीआरडीओIndiaभारत