शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काबूलमध्ये ड्रोन हल्ला; आयसिसच्या हल्लेखारांना संपविल्याचा अमेरिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 07:36 IST

अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली आहे.

वाॅशिंग्टन/काबूल : काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिशेब चुकता केल्यानंतर ४८ तासांमध्येच अमेरिकेने एक माेठा हल्ला उधळून लावला आहे. ड्राेनने एअर स्ट्राईक करुन काबूल  विमानतळाकडे निघालेल्या काही आत्मघाती हल्लेखाेरांना संपविले. हल्लेखाेर पाकिस्तानशी जवळीक असलेल्या खाेरासान गटाचे हाेते. काबूल  विमानतळावर पुढील २४ ते ३६ तासांमध्ये आयसिसकडून आणखी हल्ले हाेण्याचा धोका कायम असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली आहे. काबूल  विमानतळाजवळ कारमधून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या काही आत्मघाती हल्लेखाेरांना टार्गेट करण्यात आले. हल्लेखाेर आयसिसच्या खाेरासान गटाचे हाेते. ड्राेनचा वापर करून दुपारच्या सुमारास अमेरिकेने वाहनावर राॅकेटने मारा केला. रॉकेटने त्यांना उडविल्यानंतर वाहनातील स्फाेटकांचाही भीषण स्फाेट झाला. (वृत्तसंस्था)

नंतर अमेरिकेला अधिकार नाहीत : तालिबान

अमेरिकेला ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक करण्याचा अधिकार राहणार नाही. यापुढे असा प्रयत्न राेखण्यात येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने दोन दिवसांमध्ये दोन एअर स्ट्राईक केले आहेत.

...तर आणखी एअर स्ट्राइक करू : बायडेन

बायडेन यांनी आणखी एअर स्ट्राईक करण्याचे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १३ अमेरिकन सैनिकांचे पार्थिव अमेरिकेतील डेलवेअर येथे दाखल झाले. बायडेन यावेळी स्वत: उपस्थित होते.

उरले दोन दिवस

अमेरिकेकडे अफगाणिस्तानातून संपूर्ण माघारीसाठी केवळ दाेन दिवस शिल्लक आहेत. अमेरिकेने बचाव माेहिमेचा वेग वाढवला असला तरीही आयसिसकडून काबूल विमानतळाला पुन्हा लक्ष्य केले जाऊ शकते.  काही दिवसांपूर्वीच आयसिसने केलेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला हाेता.

आयसिसच्या खाेरासान गटात अनेक भारतीय

आयसिसच्या खाेरासान गटात अनेक भारतीय सामील असल्याचा दावा संघटनेच्या कमांडरने केला आहे. याच्या हाताखाली ६०० जण असून, त्यात माेठ्या संख्येने पाकिस्तानी व भारतीय आहेत. आम्हाला इस्लामी शरिया कायदा लागू करायचा आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानमध्ये आयसिसला पाय पसरणे साेपे होईल, असे तो म्हणाला.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान