शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; ८ जण जखमी, प्रवासी विमानाचंही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:28 IST

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील दक्षिण-पश्चिम भागाताली एका विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं मोठा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.

Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील दक्षिण-पश्चिम भागाताली एका विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं मोठा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यात ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून विमानतळावर उभ्या असलेल्या एका प्रवासी विमानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. स्थानिक सरकारी वृत्तवाहिनीनंही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. येमेनमध्ये हूती विद्रोहींच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियावर हा हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबादीर स्वीकारलेली नाही. (Drone attack on Saudi Arabia Abha airport wounds eight Yemen Houthi Rebels)

गेल्या २४ तासांत सौदी अरेबियाच्या अबहा विमानताळवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी देखील अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. पण त्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं. येमेनमध्ये इराण समर्थक शिया विद्रोहींशी लढणाऱ्या सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाखालील सैन्य संघटनेनं या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. यात नेमकं किती लोक जखमी झाले आहेत याचीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यात किमान ८ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. विस्फोटक ड्रोनला पाडल्याचा दावा देखील सौदीच्या सैन्यानं केला आहे. 

फेब्रुवारीतही झाला होता हल्लायेमेनच्या हूती विद्रोहकांनी सौदीतील अबहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका प्रवासी विमानाला आग लागली होती. अग्निशमन दलानं तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नव्हती. सौदी अरेबियातील सामान्य नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप कर्नल तुर्की अल मलिकी यांनी केला होता. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाTerror Attackदहशतवादी हल्ला