शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:02 IST

कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थित असताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध लढाई सुरुच राहिल असं म्हटलं.

PM Modi at G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७  शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी  कॅनडाच्या पंतप्रधानांसह दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नेत्यांची भेट घेतली. जी-७ आउटरीच सत्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला. तसेच या जागतिक धोक्याविरुद्ध एकत्रित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले. कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.

कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांचे शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी कार्नी यांनी आपण ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा संक्रमण, एआयचे भविष्य, दहशतवादाविरुद्धच्या लढाईवर एकत्र काम करू शकतो. तुम्ही येथे असणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असं म्हटलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना चांगलेच फटकारले. 

"जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी, आपले विचार आणि धोरण स्पष्ट असले पाहिजेत. जर एखादा देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. एकीकडे, आपण आपल्या मर्जीनुसार विविध निर्बंध लादतो, तर दुसरीकडे, जे देश उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देतात त्यांना बक्षीस दिले जाते. हे दुहेरी निकष थांबले पाहिजेत. २२ एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ पहलगामवर हल्ला नव्हता तर प्रत्येक भारतीयाच्या ओळखीवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला होता. तो संपूर्ण मानवतेवर हल्ला होता.," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध जागतिक स्तरावर कडक कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCanadaकॅनडाPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर