शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

बॉम्बस्फोटानं हादरलं फिलिपिन्स, चर्चमध्ये झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 08:31 IST

फिलिपिन्स हा देश पुन्हा एका बॉम्बस्फोटानं हादरला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी दक्षिण फिलिपिन्सममधल्या एका द्विपावरच्या चर्चवर निशाणा साधला आहे.

मनिला- फिलिपिन्स हा देश पुन्हा एका बॉम्बस्फोटानं हादरला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी दक्षिण फिलिपिन्सममधल्या एका द्विपावरच्या चर्चवर निशाणा साधला आहे. या चर्चमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटानं 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात दहशतवाद्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात मुस्लिम प्रांत व्हावे म्हणून लोकांनी मतदान केलं होतं.राष्ट्रपतींचे प्रवक्ते सल्वाडोर पनेलो म्हणाले, या हल्ल्याच्या सूत्रधारांचा आम्ही लवकरच शोध घेऊ, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही गय केली जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात दहशतवादी संघटना इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 5 सैनिक, तटरक्षक दलाचा एक जवान आणि 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 83हून अधिक लोक जखमी आहेत.ख्रिश्चनबहुल असलेल्या फिलिपिन्सच्या दक्षिण क्षेत्रात कायम दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरू असतो. आताही कॅथेड्रल चर्चमधल्या आतमध्ये हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटानं चर्चाच्या खिडक्यांचाही चक्काचूर झाला. तिथेच अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. बॉम्बस्फोट झाला तिथे बैठक सुरू होती. चर्चमधल्या झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बाहेरही बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यात अनेक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ मदत करण्यासाठी आलेले सैनिक दुसऱ्या बॉम्बस्फोटाचे शिकार झाले आहेत. या दोन बॉम्बस्फोटांमुळे चर्चचं मोठं नुकसान झालं आहे. आठवड्याभरापूर्वीच दक्षिण फिलिपिन्सला मुस्लिमबहुल भाग घोषित करण्यासाठी एक जनमत संग्रह घेण्यात आलं होतं. अनेकांनी या जनमताच्या बाजूनं कौल दिला होता. जेणेकरून दहशतवाद्यांचा उपद्रव कमी होईल. परंतु जनमत संग्रहानंतही दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.