शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

दात पडला तर घाबरू नका, चक्क प्रयोगशाळेत तयार केला मानवी दात; पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:27 IST

एका अहवालानुसार, मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत दात तयार करण्यात आले होते. ते जबड्यावर सहजपणे लावता येतील.

लंडन : किंग्ज कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत मानवी दात वाढविण्यात यश आले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेत दात वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीनुसार, ते मानवी तोंडातदेखील वाढवता येतात. जर असे झाले तर दंतचिकित्सा क्षेत्रातील हे एक मोठे संशोधन असेल. त्यामुळे आता दात तुटले तरी लोकांना फिलिंग्ज किंवा इम्प्लांटऐवजी नैसर्गिक दात मिळू शकतील.

एका अहवालानुसार, मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत दात तयार करण्यात आले होते. ते जबड्यावर सहजपणे लावता येतील. कोणत्याही दोषाच्या बाबतीत ते खऱ्या दाताप्रमाणे दुरुस्त करता येतील. शास्त्रज्ञांची टीम आता दोन पद्धतींवर प्रयोग करत आहे. पहिली पद्धत म्हणजे प्रयोगशाळेत पूर्ण दात वाढवणे आणि तो जबड्यात रोपण करणे. 

पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील

दुसऱ्या पद्धतीत, दाताच्या सुरुवातीच्या पेशी जबड्यात बसवल्या जातील. तिथे दात स्वतःहून विकसित होईल. दुधाचे दात पडल्यानंतर बालपणात नवीन दात येतात तसे ते हळूहळू वाढतील. 

जर दात तुटला तर त्याच्या जागी नवीन दात येऊ शकेल यासाठी शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. या प्रक्रियेत, दातांच्या लहान सुरुवातीच्या पेशी मानवी जबड्यात घातल्या जातील. या पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील, असे शास्त्रज्ञांच्या टीमचे सदस्यांनी सांगितले. 

हत्तींसारखा पर्याय मानवांकडे नाही...

शार्क, मासे आणि हत्ती आयुष्यभर नवीन दात वाढवू शकतात, परंतु मानवांकडे असा पर्याय नाही. लोकांचे दात तुटल्यावर ते फिलिंग्ज व इम्प्लांट करतात. हा तात्पुरता उपाय आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की फिलिंग्ज, इम्प्लांट्स कालांतराने दातांना इजा पोहोचवतात. प्रयोगशाळेत वाढवलेले दात खऱ्या दातांसारखे असतील. ते देखील अधिक मजबूत असतील. पेशींपासून तयार केलेले, जबड्यात सहजपणे बसवले जातील.

टॅग्स :Dental Care Tipsदातांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन