इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली साप्ताहिक सुट्टी देखील रद्द केली आहे. ट्रम्प आता सुट्टीवर न जाता व्हाईट हाऊसमध्येच ठाण मांडून बसले असून, बंद दाराआड उच्चस्तरीय बैठकांचा धडाका सुरू आहे. या हालचालींमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुट्टी रद्द करून ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये
नेहमीप्रमाणे विकेंडला सुट्टी घेणारे ट्रम्प यावेळी मात्र पूर्णवेळ कामात व्यस्त आहेत. व्हाईट हाऊसकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि लष्करी रणनीती आखण्यासाठी ट्रम्प यांनी स्वतःला बैठकांमध्ये झोकून दिले आहे. इराणने जागतिक समुद्री मार्गांवर दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने आपली तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.
संरक्षण बजेटमध्ये विक्रमी वाढ
युद्धाच्या या सावटात ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन संसदेकडे एक ऐतिहासिक प्रस्ताव पाठवला आहे. पुढच्या वर्षासाठी १.५ ट्रिलियन डॉलर (सुमारे १२५ लाख कोटी रुपये) इतक्या प्रचंड संरक्षण बजेटची मागणी करण्यात आली आहे. हे बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्क्यांनी जास्त आहे. इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे लष्करी खर्च वेगाने वाढत असल्याने ही मोठी तरतूद करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी वाढ!
जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा खर्च दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. १९४५ नंतर प्रथमच संरक्षण बजेटमध्ये एकाच वेळी ४२ टक्क्यांची वाढ सुचवण्यात आली आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती नसून, अमेरिका मोठ्या युद्धासाठी सज्ज होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
लोकांसाठीच्या योजनांना कात्री, लष्करावर भर
ट्रम्प प्रशासनाने या प्रस्तावात एक मोठी अटही घातली आहे. संरक्षण खर्च वाढवण्यासाठी इतर गैर-लष्करी योजनांच्या बजेटमध्ये ७३ अब्ज डॉलरची (सुमारे १० टक्के) कपात करण्याची मागणी केली आहे. अनावश्यक सरकारी कार्यक्रम बंद करून ती जबाबदारी स्थानिक राज्यांवर सोपवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. या बजेटवर येत्या काही आठवड्यांत अमेरिकन संसदेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Trump canceled his vacation due to rising tensions with Iran, focusing on military strategy at the White House. A record defense budget request signals potential large-scale conflict, prioritizing military spending over social programs. The US may be preparing for war.
Web Summary : ईरान के साथ बढ़ते तनाव के कारण ट्रंप ने छुट्टी रद्द कर दी, और व्हाइट हाउस में सैन्य रणनीति पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। रिकॉर्ड रक्षा बजट संभावित बड़े पैमाने पर संघर्ष का संकेत देता है, सैन्य खर्च को सामाजिक कार्यक्रमों पर प्राथमिकता दी जा रही है। अमेरिका युद्ध की तैयारी कर रहा है।