Donald Trump: राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे तीन मोठे निर्णय; दक्षिण सीमेवर आणीबाणी, सैन्य पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 23:16 IST2025-01-20T23:16:08+5:302025-01-20T23:16:40+5:30

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

Donald Trump's three big decisions as soon as he became president; Emergency on the southern border, will send troops | Donald Trump: राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे तीन मोठे निर्णय; दक्षिण सीमेवर आणीबाणी, सैन्य पाठविणार

Donald Trump: राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे तीन मोठे निर्णय; दक्षिण सीमेवर आणीबाणी, सैन्य पाठविणार

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच तातडीने सैन्य रवाना करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. 

याचबरोबर ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. वाढलेला खर्च आणि वाढत्या ऊर्जेच्या किमतींमुळे महागाई वाढली आहे आणि म्हणूनच आज मी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर करत आहे, असे ट्रम्प म्हणाले. 

देशात बदलाची लाट आहे. सूर्यप्रकाश संपूर्ण जगावर पडत आहे. अमेरिकेकडे या संधीचा फायदा घेण्याची संधी आहे जी यापूर्वी कधीही नव्हती. ज्यांना आमचे काम थांबवायचे आहे त्यांनी माझे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि प्रत्यक्षात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.पेनसिल्व्हेनियामध्ये एक गोळी माझ्या कानाच्या आरपार गेली. मला तेव्हाही आणि आताही वाटत आहे की, माझा जीव एका कारणासाठीच वाचला. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी देवाने मला वाचवले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. 

आरोग्य, शिक्षण लाजिरवाणी व्यवस्था...

आपल्याकडे अशी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे जी आपत्तीच्या वेळी काम करत नाही. आपण त्यावर इतर देशांपेक्षा जास्त खर्च करतो. आपल्याकडे अशी शिक्षण व्यवस्था आहे जी आपल्या मुलांना स्वतःची लाज वाटायला आणि बऱ्याचदा आपल्या देशाचा द्वेष करायला शिकवते. आजपासूनच हे सर्व बदलेल, असेही ट्रम्प म्हणाले. 

Web Title: Donald Trump's three big decisions as soon as he became president; Emergency on the southern border, will send troops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.