ट्रम्प यांचे टेरिफ वॉर लोकांना 'महागाई'त बुडविणार; अमेरिकेत अंड्यांची तस्करी ड्रग्सपेक्षाही वाढली, पहा किती आहे दर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 14:00 IST2025-03-16T14:00:27+5:302025-03-16T14:00:50+5:30
America's Inflation: अमेरिकेच्या उत्पादनांवर शेजारी देशांसह जगभरातील इतरही देश जास्त कर आकारत असल्याने ट्रम्प यांनी देखील या देशांवर जादा कर लादला आहे. याचा परिणाम असा झाला की १०० रुपयांना मिळणारी वस्तू अचानक २००-२२० रुपयांना मिळू लागली आहे.

ट्रम्प यांचे टेरिफ वॉर लोकांना 'महागाई'त बुडविणार; अमेरिकेत अंड्यांची तस्करी ड्रग्सपेक्षाही वाढली, पहा किती आहे दर...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पदभार सांभाळताच टेरिफवरून जगात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याच्याच साथीने त्यांनी सरकारी कर्मचारऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली. आता ट्रम्प यांच्या कर्माची फळे अमेरिकन लोकांना भोगावी लागणार आहेत. टेरिफ युद्धामुळे इतर देशांनीही अमेरिकेवर जादा टेरिफ लादण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने आपल्या शेजारी देशांनाही सोडलेले नाहीय, ज्या देशांवर अमेरिकेची अन्न साखळी अवलंबून आहे. यामुळे अमेरिकेत महागाईने दोन महिन्यांतच कहर करण्यास सुरुवात केली असून लोक आता खाद्यपदार्थ्यांच्या स्मगलिंगकडे वळू लागले आहेत.
अमेरिकेच्या उत्पादनांवर शेजारी देशांसह जगभरातील इतरही देश जास्त कर आकारत असल्याने ट्रम्प यांनी देखील या देशांवर जादा कर लादला आहे. याचा परिणाम असा झाला की १०० रुपयांना मिळणारी वस्तू अचानक २००-२२० रुपयांना मिळू लागली आहे. इतर वस्तूंचे सोडले तरी किराणा साहित्य खूप महाग झाले आहे. अमेरिकेची अन्न धान्याची गरज ही शेजारी देशांवर अवलंबून होती. त्यांच्यावर कर लावल्याने आता या वस्तू खासकरून अंडी महागली आहेत. अंड्याच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की अमेरिकी लोक आता ही अंडी शेजारील मेक्सिको आणि कॅनडामधून तस्करी करू लागले आहेत.
ट्रम्प यांनी छेडलेले टेरिफ वॉर आता अमेरिकन लोकांचा खिसा खाली करू लागले आहे. इतर देशांनीही टेरिफ वाढविल्याने अमेरिकेची उत्पादने आणखी महाग झालेली आहेत. यामुळे इतर देशांत अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री थंडावणार आहे. हा फटका असतानाच अमेरिकेत मोठी मंदीची लाट उसळण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. कंपन्यांचे उत्पन्न रोडावणार तसेच नागरिकांना महागाईमुळे खिसा रिकामा करावा लागणार असा दुहेरी झटका आता अमेरिकेला एकट्या ट्रम्प आणि मस्क यांच्या हेकेखोरपणामुळे भोगावा लागणार आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार सीमेवर अंड्यांनी भरलेले क्रेट पकडले जात आहेत. विनापरवानगी कोंबडीशी संबंधीत उत्पादन आणले म्हणून दंड आकारला जात आहे. अंड्यांच्या तस्करीचे प्रमाण हे ड्रग्जपेक्षाही वाढल्याचे यात म्हटले आहे. अमेरिकेत एक डझन अंड्याची किंमत १० डॉलर म्हणजेच ८७० रुपये झाली आहे. तर मेक्सिकोत एक डझन अंडी २ डॉलरपेक्षा कमी दराने मिळत आहेत.यामुळे स्मगरल तिकडे खरेदी करून अमेरिकेत अंडी आणण्याचा प्रयत्नात आहेत.
ब्लँकेटमध्ये, स्पेअर टायरमध्ये किंवा अन्य किराणा साहित्यासोबत अंडी लपवून आणली जात आहेत. सीमेपलीकडे बसलेले लोक अंडी विकण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट आणि स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपची मदत घेत आहेत. तिथे ७-८ डॉलरने अंडी विकली जात आहेत.