शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 00:09 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.

ट्रम्प यांच्या 'त्या' पोस्टमुळे उडाली घबराट

या पळापळीचे मोठे कारण ट्रम्प यांनी त्यांच्या 'टुथ सोशल' (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली एक पोस्ट आहे. ट्रम्प यांनी लिहिले होते की, "प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!" त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, "इराणने मी सांगितलेली 'डील' मान्य करायला पाहिजे होती. किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि किती मानवी नुकसान झाले आहे. मी वारंवार सांगितले आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळू शकत नाहीत."

धमकीमुळे कुटुंबे शहर सोडून पळू लागली!

ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अनेक लोकांनी दावा केला की, त्यांची कुटुंबे राजधानी सोडून जात आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "माझ्या आईने सांगितले की ते सगळे तेहरान सोडत आहेत. सर्व लोक रस्त्यावर पळत आहेत. रस्त्यांवर इतकी गर्दी आहे की, गाड्या हलूही शकत नाहीत."

दरम्यान, इस्रायलने गेल्या शुक्रवारी (१० जून) इराणवर अचानक हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांचा उद्देश इराणची अणुबॉम्ब ठिकाणे, वैज्ञानिक आणि लष्करी नेतृत्व यांना लक्ष्य करणे होता. इस्रायलचा दावा आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत.

तेहरानची लोकसंख्या इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी!

या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर इराणमध्ये २२४ हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. सध्या तेहरानमध्ये सुमारे १ कोटी लोक राहतात, जी इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की, लोक खाण्यापिण्याचे सामान घेऊन पळत आहेत आणि शहर सोडण्याची स्पर्धाच लागली आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध