डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक्सिकोवर अतिक्रमण; खाडीचे नाव बदलून अमेरिकन केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:57 IST2025-02-10T14:57:34+5:302025-02-10T14:57:56+5:30

ट्रम्प यांचे एअरफोर्स वन विमान मेक्सिकोच्या खाडीवरून उड्डाण करत असताना ट्रम्प यांनी या विमानातच आदेशावर सही केली आहे.

Donald Trump's encroachment on Mexico; Gulf renamed American | डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक्सिकोवर अतिक्रमण; खाडीचे नाव बदलून अमेरिकन केले

डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक्सिकोवर अतिक्रमण; खाडीचे नाव बदलून अमेरिकन केले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या ४०० वर्षंपासून ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी असे केले आहे. याच्या आदेशावर ट्रम्प यांनी आज सह्या केल्या आहेत. 

ट्रम्प यांचे एअरफोर्स वन विमान मेक्सिकोच्या खाडीवरून उड्डाण करत असताना ट्रम्प यांनी या विमानातच आदेशावर सही केली आहे. ट्रम्प हे न्यू ऑर्लियंसमध्ये सुपर बाईल कार्यक्रमाला जात होते. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी याची घोषणा केली होती. आता यावर अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार आजपासून ही खाडी अमेरिकन खाडी म्हणून ओळखली जाणार आहे. 

ट्रम्प यांच्या या कारकीर्दीत विस्तारवाद फोफावण्याची शक्यता आहे. एकीकडे चीनला विरोध करत ट्रम्प अमेरिकन खंडांतील देशांवर नियंत्रण मिळवू पाहत आहेत. शिवाय इस्रायलने उध्वस्त केलेल्या गाझापट्टीलाही आपल्या ताब्यात ठेवू इच्छित आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकन संघराज्यात घेण्याची इच्छा जाहीर केली आहे. आता त्यांनी यादिशेने पहिले पाऊल टाकले आहे. 

मेक्सिको खाडीचे नाव बदलण्यामागे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्यू मेक्सिको शहरामुळे या खाडीला मेक्सिको खाडी असे म्हटले जात होते, असा युक्तीवाद केला आहे. या खाडीवर अधिकांश अमेरिकेचे वर्चस्व आहे. ही खाडी आर्थिक बाबींसाठी महत्वाची आहे. यामध्ये मच्छी पालन, वीज निर्मिती आणि व्यापार आदी गोष्टी आहेत. यामुळे या खाडीला अमेरिकेची खाडी म्हणून ओळखले जावे, असे ट्रम्प याचे म्हणणे होते. ट्रम्प यांनी जरी या खाडीचे नाव बदलले असले तरी जग या नव्या नावासाठी बांधिल नाही. ट्रम्प यांचा हा आदेश मेक्सिकोविरोधातील कारवाईचा भाग मानला जात आहे. 

Web Title: Donald Trump's encroachment on Mexico; Gulf renamed American

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.