डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका, टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:59 AM2020-08-16T02:59:37+5:302020-08-16T06:40:35+5:30

बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

Donald Trump's blow to China, order to sell Tiktok's assets | डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका, टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका, टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी कंपनी असलेल्या बाइटडान्सला टिकटॉक अ‍ॅपचा अमेरिकेतील संपूर्ण व्यवसाय विकण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे कंपनीला ९० दिवसांची मुदत दिली आहे. बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती. ते म्हणाले होते की, हे दोन्ही कंपन्यांमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणाला धोका पोहचू शकतो. टिकटॉकसंदर्भात दिलेल्या आदेशाचा नेमका काय अर्थ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेत १० कोटी या अ‍ॅपचा वापर करतात.
अमेरिकेतील नागरिकांकडून घेतलेला किंवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत करण्यास ट्रम्प यांनी सांगितले आहे. अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्याबाबत मायक्रोसॉफ्टशी चर्चा सुरु आहे. मायक्रोस्फॉट किंवा अन्य कुठलीही कंपनी अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय घेण्यास असमर्थ ठरली तर १५ सप्टेंबरपासून टिकटॉकवर बंदी घातली जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
।कम्युनिस्ट पक्षावर साधला निशाणा
डाटा गोळा केल्याने चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेन नागरिकांची खासगी माहिती मिळते असे ट्रम्प यांनी म्हटले होते. या माहितीचा चीन ब्लॅकमेलिंगसाठीही वापर करु शकतो. प्रसंगी कॉर्पोरेट हेरगिरीकरिताही या माहितीचा आधार घेऊ शकतात. चीन अमेरिकेतील कर्मचारी, कंत्राटदार यांची ठिकाणेही ट्र्ॅक करु शकतात असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.

Web Title: Donald Trump's blow to China, order to sell Tiktok's assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.