ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:24 IST2025-10-25T12:23:58+5:302025-10-25T12:24:26+5:30
Donald Trump, Xi Jinping Meet : डोनाल्ड ट्रम्प हे मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते आसियान शिखर संमेलन आणि एपीईसी शिखर संमेलनातही भाग घेणार आहेत.

ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या महत्त्वाच्या पाच दिवसांच्या आशिया दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या भेटीचा अजेंडा स्पष्ट केला आहे. या भेटीत ट्रम्प तैवानचा मुद्दा आणि हाँगकाँगचे लोकशाहीवादी नेते जिमी लाई यांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते आसियान शिखर संमेलन आणि एपीईसी शिखर संमेलनातही भाग घेणार आहेत. यावेळी ते जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियासोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते चीनसोबतही कळीचा मुद्दा छेडण्याची शक्यता आहे. पुतीन यांनी ट्रम्प यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे. आता ट्रम्प यांनी आशियाकडे आपला मोर्चा वळविला आहे.
'रशिया'च्या मुद्द्यावर चीनचे सहकार्य हवे
एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "रशियाच्या मुद्द्यावर चीनने आम्हाला मदत करावी. चीनने या प्रकरणात आमची भूमिका समजून घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे, अशी माझी इच्छा आहे." अमेरिकेने नुकतेच रशियावर नवे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना ट्रम्प यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
#WATCH | Regarding his upcoming meeting with Chinese President Xi, US President Donald Trump says, "...We have a lot to talk about with President Xi, and he has a lot to talk about with us. I think we'll have a good meeting."
— ANI (@ANI) October 25, 2025
"I will be talking about Taiwan. I won't go there,… pic.twitter.com/shISVXYopa
तैवान आणि जिमी लाईचा मुद्दा
जिनपिंग यांच्यासोबतच्या भेटीत ट्रम्प हे तैवान आणि जिमी लाई या दोन संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आमच्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे. शी जिनपिंग यांच्याकडेही आमच्याशी बोलण्यासाठी बरेच काही असेल. ही भेट चांगली होईल, असे मला वाटते. मी तैवानच्या मुद्द्यावर नक्कीच चर्चा करेन. तैवानबद्दल मला खूप आदर आहे, असे ट्रम्प म्हणाले.
तसेच 'एप्पल डेली' या लोकशाही समर्थक वृत्तपत्राचे संस्थापक जिमी लाई यांना चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत हाँगकाँगमध्ये तुरुंगात टाकण्यात आले आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगच्या या लोकशाहीवादी नेत्याच्या सुटकेचा मुद्दाही जिनपिंग यांच्यासमोर उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.