शपथविधी समारंभादरम्यान पत्नीला किस करायला गेले डोनाल्ड ट्रम्प, मधेच आली हॅट अन्...; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:21 IST2025-01-21T12:20:44+5:302025-01-21T12:21:28+5:30
हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत...

शपथविधी समारंभादरम्यान पत्नीला किस करायला गेले डोनाल्ड ट्रम्प, मधेच आली हॅट अन्...; VIDEO व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात दोघेही 'एअर किस' देताना दिसत आहेत. दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शपथ घेण्याच्या काही क्षण आधीच ही घटना घडली. खरे तर, जेडी व्हेन्स यांच्या जवळ उभे राहण्यापूर्वी, ट्रम्प पत्नी मेलानियाकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जातात. दोघेही किस करण्यासाठी एकमेकांकडे झुकतात. मात्र, तसे होऊ शकत नाही. कारण, मेलानिया यांची हॅट मधेच अडथळा बनते आणि अशा परिस्थितीत ट्रम्प आणि मेलानिया केवळ 'एअर किस'च देऊ शकतात.
हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले आहे, "मला आता कळले की मेलानिया रुंद काठाची टोपी का घालतात, याद्वारे त्या ट्रम्प यांचा किस करण्याचा प्रयत्न फेल करतात. त्या चतुर आहेत!" आणखी एकाने लिहिले, "ट्रम्प यांनी मेलानिया यांना, आता ती टोपी घालू नकोस, असे सांगितले असावे." अशा आणखीही काही कमेंट आल्या आहेत.
Donald Trump gives Melania an air kiss before stepping into the spotlight for the inauguration.
— NoComment (@nocomment) January 20, 2025
For more #nocomment videos > https://t.co/f4lUW8IpTGpic.twitter.com/emGWJNNItL
47वे राष्ट्रपती म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतली -
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला 'लिबरेशन डे' अथवा 'मुक्ती दिन' म्हणत, अमेरिकेचा 'सुवर्णयुगा'ला प्रारंभ झाला असल्याचे म्हटेल आहे. 'अमेरिका फर्स्ट' या अजेंड्यावर भर देत ट्रम्प म्हणाले, आपण देशाला सुरक्षित आणि ऊर्जा क्षेत्रात अग्रणी बनवण्यासाठी धाडसी पावले उचलणार आहोत. याशिवाय, बायडेन प्रशासनाची धोरणे बदलण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठीही त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांचीही घोषणा केली.