वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:51 IST2025-09-10T16:51:33+5:302025-09-10T16:51:48+5:30
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेहमी व्हाईट हाईसमध्येच जेवण करतो. परंतू, ट्रम्प यांना सुरक्षित वॉशिंग्टन अनुभवायचे होते.

वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले होते. गुन्हेगारी वाढल्याने ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. आता महिनाभरानंतर वॉशिंग्टन कसे सुरक्षित बनले आहे, हे दाखविण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. सोबत जे डी वेन्स आणि इतर मंत्री देखील होते. परंतू, तिथे त्यांना हिटलर आणि फ्री पॅलेस्टाईनचे नारे ऐकायला मिळाले.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेहमी व्हाईट हाईसमध्येच जेवण करतो. परंतू, ट्रम्प यांना सुरक्षित वॉशिंग्टन अनुभवायचे होते. म्हणून ते व्हाईट हाईसपासून जवळच असलेल्या १५ व्या स्ट्रीटवरील जोज सीफूड, प्राइम स्टीक अँड स्टोन क्रॅब रेस्टॉरंटमध्ये गेले. सोबत सगळा लवाजमाही होता.
ट्रम्प आल्याने रेस्टॉरंटमधील सर्वच लोक शॉक झाले. परंतू, तिथे काही पॅलेस्टीन प्रेमीही होते. त्यांनी ट्रम्प यांना पाहून लगेचच फ्री पॅलेस्टीनचे नारे देण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी ट्रम्प यांना हिटलरही म्हटले. या पॅलेस्टीन प्रेमींनी त्यांच्याकडे असलेले झेंडेही दाखविले.
या दरम्यान ट्रम्प या लोकांकडे पाहत पुढे जात होते. तर जेडी वेन्स इतर लोकांना जेवणाची मजा घ्या असे सांगत होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.