“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:32 IST2026-04-11T09:29:38+5:302026-04-11T09:32:44+5:30

America Iran Ceasefire: इराणी लोक लढण्यापेक्षा खोट्या बातम्या तयार करण्यात आणि जनसंपर्क सांभाळण्यात अधिक पटाईत आहेत, असा टोला ट्रम्प यांनी लगावला.

donald trump warns that there is no other option the only reason they are alive today is to negotiate | “बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी

“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी

America Iran Ceasefire: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणारी ऐतिहासिक शांतता चर्चा अत्यंत नाजूक वळणावर असतानाच पश्चिम आशियातील तणाव पुन्हा विकोपाला गेला आहे. इस्रायल व हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या वाटाघाटी फिस्कटण्याची भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघड धमकी दिली आहे.

लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू होत नाही तसेच अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी दिला जात नाही तोपर्यंत चर्चा सुरू केली जाणार नाही, अशी अट इराणने ठेवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता चर्चा निष्फळ ठरल्यास इराणविरुद्ध कठोर लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. युद्धनौकांवर अत्याधुनिक व सर्वोत्तम शस्त्रसाठा सज्ज केला जात आहे. करार झाला नाही, तर या शस्त्रांचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असून, आमचे बोट ट्रिगरवर असल्याचा पलटवार इराणने केला आहे.

बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा पाकिस्तानात होणार आहे. चर्चेच्या काही तास आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा उघड धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगाला धमकावणे, खंडणी वसूल करण्याव्यतिरिक्त आपल्या हाती अन्य कोणतेही साधन उरलेले नाहीत. याची इराणच्या लोकांना कदाचित जाणीव झालेली नाही. आज ते केवळ वाटाघाटी करण्यासाठीच जिवंत आहेत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. 

दरम्यान, आपण अशा लोकांशी व्यवहार करत आहोत, जे खरोखरच आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही. ते आपल्याला केवळ तोंडदेखले सांगत आहेत की, ते अण्वस्त्रे नष्ट करत आहेत. परंतु, मग ते प्रसारमाध्यमांकडे जाऊन सांगतात की त्यांना युरेनियमचे संवर्धन करायचे आहे. इराणी लोक लढण्यापेक्षा खोट्या बातम्या तयार करण्यात आणि जनसंपर्क सांभाळण्यात अधिक पटाईत आहेत, असा टोला ट्रम्प यांनी लगावला.

 

Web Title : ट्रम्प की ईरान को धमकी: केवल बातचीत के लिए जिंदा हो, कोई विकल्प नहीं।

Web Summary : नाजुक शांति वार्ता के बीच, ट्रम्प ने ईरान को बातचीत विफल होने पर सैन्य कार्रवाई की धमकी दी। उन्होंने ईरान पर जबरन वसूली का आरोप लगाया और उनकी परमाणु मंशा पर सवाल उठाया, यह कहते हुए कि वे केवल बातचीत के लिए जिंदा हैं। ईरान ने चेतावनी दी कि वे किसी भी स्थिति के लिए तैयार हैं।

Web Title : Trump Threatens Iran: Only Alive to Negotiate, No Other Option.

Web Summary : Amid fragile peace talks, Trump threatened Iran with military action if negotiations fail. He accused Iran of extortion and questioned their nuclear intentions, stating they are only alive to negotiate. Iran warned they are ready for any situation.