शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:02 IST

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर इराणने कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही प्रकारे आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य संपूर्ण ताकदीने तुमच्यावर तुटून पडेल, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेलं नसेल" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

शनिवारी इस्रायलने तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं आणि इराणच्या बुशेहर प्रांतातील साउथ पार्स गॅस फील्डशी जोडलेल्या नॅचरल गॅस प्रोसेसिंग युनिटवर हल्ला केला. याच दरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की,  "ते इराण आणि इस्रायलमधील वाद सोडवण्यासाठी मार्ग काढू शकतात, करार करू शकतात आणि हा संघर्ष संपवू शकतात." रविवारी इराणने तेहरान आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान सुरू असलेल्या आण्विक चर्चेचा सहावा टप्पा रद्द केला.

रविवारी सकाळी इस्रायलच्या बट याममध्ये इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. शहराच्या महापौरांनी ही माहिती दिली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

इराणचे हल्ले शनिवारी सुरू झाले, जे रात्रभर आणि रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिले. देशभरात झालेल्या या हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला, ज्यात एक १० वर्षांचा मुलगा आणि एक २० वर्षांची महिला यांचा समावेश आहे. १४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री किती इमारतींवर हल्ला करण्यात आला याची अद्याप पुष्टी झालेली नाही. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धnuclear warअणुयुद्ध