न बोलवता अचानक लग्नात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल

By Admin | Updated: June 13, 2017 15:30 IST2017-06-13T15:13:41+5:302017-06-13T15:30:15+5:30

अचानक एका लग्नात पोहोचून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Donald Trump, Video Viral | न बोलवता अचानक लग्नात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल

न बोलवता अचानक लग्नात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाइन लोकमत
न्यूजर्सी, दि. 13 - अचानक एका लग्नात पोहोचून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शनिवारी रात्री उशीरा बेडमिंस्टर टाउनशिप येथील ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लबमध्ये एका लग्नात ट्रम्प पोहोचले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, गोल्फ क्लबमध्ये रात्री एका लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती, साधारण साडे दहाच्या सुमारास ट्रम्प येथे पोहोचले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती त्याच इमारतीत ट्रम्प देखील आहेत याची पार्टीमध्ये उपस्थितांना थोडीफारही कल्पना नव्हती.    
 
पार्टीमध्ये उपस्थित सर्वांना ट्रम्प यांनी स्वतःच्या स्वाक्षरीत  ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असं लिहिलेल्या टोप्या वाटल्याचं वृत्त आहे. ट्रम्प पार्टीत पोहोचल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प नव वधूला शुभेच्छा देताना व सोबत फोटो काढताना दिसत आहेत. यावेळी वधू-वरासोबत ट्रम्प यांनी ठेकाही धरला होता असंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. पार्टीतील लोकं युएसए, युएसए अशा घोषणा देत असल्याचंही ऐकायला मिळत आहे. 
 
हा व्हिडीओ सोशल मीडियालर सध्या चांगलाच पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यापुर्वी 2015 मध्ये माजी राष्ट्रपती बराक ओबामा हे देखील एका लग्नात सरप्राईझ भेट दिली होती.
 
 

Web Title: Donald Trump, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.