काय सांगता? 4 वर्षांत तब्बल 20,000 हून अधिक वेळा डोनाल्ड ट्रम्प बोलले खोटं 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:42 PM2020-11-09T13:42:30+5:302020-11-09T13:49:32+5:30

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 पासून आतापर्यंत केलेल्या विधानांपैकी अनेक विधानं ही खोटी आहेत.

donald trump told these three lies most often in his 4 year tenure as the united states president | काय सांगता? 4 वर्षांत तब्बल 20,000 हून अधिक वेळा डोनाल्ड ट्रम्प बोलले खोटं 

काय सांगता? 4 वर्षांत तब्बल 20,000 हून अधिक वेळा डोनाल्ड ट्रम्प बोलले खोटं 

Next

वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तब्बल 20 हजारांहून अधिक वेळा खोटं बोलल्याची माहिती आता समोर आली आहे. फॅक्ट चेक वेबसाईट पॉलिटीफॅक्टने (PolitiFact) याबाबत माहिती दिली आहे. पॉलिटीफॅक्टने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 पासून आतापर्यंत केलेल्या विधानांपैकी अनेक विधानं ही खोटी आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या डेटाबेसनुसार, ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या खोट्या विधानांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे. 

सर्वात मजबूत अर्थव्यवस्था केल्याचा दावा (407 वेळा)

ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 407 वेळेस आपण अर्थव्यवस्था आणखी मजबूत केली असल्याचा दावा केला आहे. वास्तविक पाहता ट्रम्प यांच्यापेक्षा आयझनहावर, लिंडन बी जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची आर्थिक व्यवस्था अधिक चांगली होती.

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा दावा (262 वेळा)

ट्रम्प यांनी राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच मेक्सिको सीमेवर होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर मोठी भिंत बांधण्याची घोषणा केली होती. लवकरच भिंत बांधण्याचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला. काँक्रिटची एक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र आधीपासून असलेल्या कुंपणाच्या भागाला वाढवण्यासाठी हे काम करण्यात आले आहे.

रशियासोबत संगनमत नाही (236 वेळा)

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील निवडणुकीत रशियासोबत संगनमत नसल्याचं सांगत आले आहेत. तर मूलर रिपोर्टमध्ये ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी त्यांच्या रशियन सहकाऱ्यांनी हिलरी क्लिंटन यांना बदनाम करण्याचा कट आखला असल्याचं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पराभूत डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार आणखी एक धक्का; मेलानिया घटस्फोट देण्याच्या तयारीत?

अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आता आणखी एक झटका बसणार आहे. कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. डेल मेलने दिलेल्या वृतानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत आहेत. मेलानिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगी स्टेफनी वोल्कॉफने हा दावा केला आहे. वोल्कॉफने डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यातील काही वर्षांचं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने मोडला तब्बल 128 वर्षे जुना रेकॉर्ड!

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी पॉप्युलर वोट्समध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायडन यांना 75 मिलियन हून अधिक मते मिळाली आहेत. अमेरिकेत झालेल्या मतदानापैकी 50 टक्क्यांहून अधिक मते बायडन यांना मिळाली. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा रेकॉर्ड मोडला आहे. ओबामा यांना 2008 मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 69,498,516 मते मिळाली होती.

Web Title: donald trump told these three lies most often in his 4 year tenure as the united states president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.