बायडेन सरकारचे 'ते' सर्व निर्णय तात्काळ रद्द करणार; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:40 IST2025-01-20T19:39:59+5:302025-01-20T19:40:40+5:30

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

Donald Trump: 'They' will immediately cancel all the decisions of the Biden government; Donald Trump's big announcement before the swearing-in ceremony | बायडेन सरकारचे 'ते' सर्व निर्णय तात्काळ रद्द करणार; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

बायडेन सरकारचे 'ते' सर्व निर्णय तात्काळ रद्द करणार; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. शपथ घेताच, जो बायडेन यांनी घेतलेले सर्व 'मूर्ख' आदेश 24 तासांच्या आत रद्द केले जातील, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याशिवाय, शपथविधीनंतर लगेच 100 महत्त्वाच्या फाइल्सवर स्वाक्षरी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले. आता शपथविधीनंतर ट्रम्प अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. याची सुरुवात जुने निर्णय रद्द करण्यापासून होणार आहे. ट्रम्प यांनी सांगितल्यानुसार, शपथविधीनंतर ते लगेच बायडन सरकारमधील अनेक निर्णय रद्द करणार आहेत. याशिवाय, त्यांनी आपल्या टीमला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. 

ट्रम्प यांच्या शपथविधीला कोण उपस्थित राहणार?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक माजी राष्ट्राध्यक्षही यात सहभागी होऊ शकतात. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि लॉरा बुश, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. यासोबतच टेस्लाचे सीईओ आणि ट्रम्पचे निकटवर्तीय इलॉन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्गदेखील उपस्थित राहणार आहेत. 

जाता जाता बायडन यांचा मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी निवर्तमान अध्यक्ष जो बायडेन यांनी डॉ. अँथनी फौकी, जनरल मार्क मिली (निवृत्त) आणि '6 जानेवारी कॅपिटल हिल हल्ल्या'च्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांना माफ केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार इशारा दिला होता की, ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करतील. या निर्णयाचा उद्देश ट्रम्प प्रशासनाकडून या लोकांना संरक्षण देणे हा आहे.

Web Title: Donald Trump: 'They' will immediately cancel all the decisions of the Biden government; Donald Trump's big announcement before the swearing-in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.