...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:51 IST2025-08-09T09:51:19+5:302025-08-09T09:51:31+5:30
Donald Trump Tariff: ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर ही धमकी दिली आहे. मला इतिहासात इतर कोणापेक्षाही न्यायालयीन व्यवस्था चांगल्या प्रकारे समजते, असे ते म्हणाले.

...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या टर्मममध्ये अमेरिकेला बुडवायला निघाले आहेत. कोणत्या जन्मीचा राग डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन लोकांवर आणि इतर देशांवर काढत आहेत, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. अशातच ट्रम्प यांनी टॅरिफवरून अमेरिकाच महामंदीत लोटली जाईल असा इशारा दिला आहे.
टॅरिफमुळे शेअर बाजारात प्रचंड वाढ होत आहे, दररोज नवीन विक्रम होत आहेत. देशाच्या तिजोरीत शेकडो अब्ज डॉलर्स येत आहेत. परंतू जर अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या न्यायालयाने टॅरिफविरुद्ध निकाल दिला तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येऊ शकते आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर ही धमकी दिली आहे. मला इतिहासात इतर कोणापेक्षाही न्यायालयीन व्यवस्था चांगल्या प्रकारे समजते. या आव्हानांमधून माझ्यापेक्षा इतर कोणीही गेलेला नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. देशाला अराजकता, अपयश आणि अपमानाची नव्हे तर यश आणि महानतेची आवश्यकता आहे. जर निकाल विरोधात दिला तर इतकी मोठी रक्कम आणि सन्मान परत मिळवणे कठीण होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.