"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:13 IST2025-12-23T12:12:11+5:302025-12-23T12:13:15+5:30
Trump On Jeffrey Epstein Files: अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी या फाइल्स जारी करायला सुरवात केली आहे...

"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एपस्टीन फाइल्ससंदर्भात भोष्य केले आहे. जे निर्दोष कोल जेफरी एपस्टीनला भेटले, त्यांची प्रतिष्ठाही लैंगिक गुन्हेगारांशी संबंधित चौकशी फाइल्स जारी झाल्याने मलीन होण्याची शक्यता आहे. तसेच हा मुद्दा आपल्या पक्षाच्या कामगिरीवरून लक्ष विचलित करणारा असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी या फाइल्स जारी करायला सुरवात केली आहे.
माझेही फोटो आहेत, सर्वांचेच... -
पत्रकारांसोबत बोलतान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'एपस्टीनशी संबंधित हे संपूर्ण प्रकर रिपब्लिकन पक्षाच्या जबरदस्त यशावरून जनतेचे लक्ष हटवण्याची एक पद्धत आहे. न्याय विभागाने जारी केलेल्या एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फोटोंच्या पहिल्या बॅचमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही दिसत आहेत. यासंदर्भात ट्रम्प यांना विचारणा केली असता ट्रम्प म्हणाले, "बिल क्लिंटन आपले आवडते नेते आहेत. माझे त्यांच्यासोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. त्यांचे फोटो अशा पद्धतीने बाहेर येताना पाहून वाईट वाटते. माझेही फोटो आहेत. या माणसाशी (एपस्टाईन) सर्वांचेच मैत्रीचे संबंध होते. बिल क्लिंटन एक मोठे व्यक्ती आहेत."
प्रतिष्टित बँकर्स, वकील आणि इतर काही लोकांचाही समावेश -
पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, कदाचित आपल्याकडे इतरही अनेक लोकांचे फोटो असतील, जे काही वर्षांपूर्वी, जेफ्री एपस्टाईनला निष्पापपणे भेटले होते, यात प्रतिष्टित बँकर्स, वकील आणि इतर काही लोकांचाही समावेश आहे. एपस्टाईनशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचे फोटोही प्रसिद्ध होत असल्याने, मोठ्या प्रमाणावर लोक नाराज आहेत."
श्रीमंत फायनान्सर एपस्टीनचा 2019 मध्ये न्यूयॉर्क येथील कारागृहात लैंगिक तस्करीच्या आरोपांवरील खटल्याची प्रतिक्षा करतानाच मृत्यू झाला. ज्याला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले होते.