शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:11 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट भीती व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेच्या सीमा मजबूत होत्या, पण आता आपत्तीची प्रतीक्षा आहे, सीमा तितक्या सुरक्षित नाहीत. मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अमेरिकेच्या सीमा खुल्या जखमेसारख्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट भीती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. यामागील कारण देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'अमेरिका आणि मेक्सिको सीमेबाबत करण्यात येत असलेला करार विध्वंस आणू शकतो. तसेच, अमेरिकेची दक्षिण सीमा जगाच्या इतिहासातील सर्वात वाईट असल्याचे सांगत अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, "तीन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या सीमा इतिहासातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित होत्या, परंतु आज असे दिसते की सीमेवर आपत्ती वाट पाहत आहे. ही सर्वात भीषण आपत्ती आहे. जगाच्या इतिहासात सीमा वाईट आहेत आणि त्या आपल्या देशासाठी खुल्या जखमा आहेत. जगभरातून दहशतवादी कोणत्याही तपासाशिवाय आपल्या देशात प्रवेश करत आहेत. अमेरिकेत सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची 100 टक्के शक्यता आहे."

डोनाल्ड ट्रम्प यांचे खासदारांना आवाहनएकीकडे, अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवर झालेल्या कराराबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन संसदेत भाष्य करत आहेत. तर दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांना कोणत्याही या करारामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन करत आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या निर्वासितांच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही बेकायदेशीर निर्वासितांचा मुद्दा समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून ज्यो बायडन यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी डोनाल्ड ट्रम्प सोडणार नाहीत, असे दिसते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन