शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:16 IST

गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि भारत आणि पाकिस्तान एकत्र राहण्याची शक्यता शाहबाज शरीफ यांना व्यक्त केली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्या विधानाशी सहमती दर्शवली.

मागील काही वर्षांपासून चालू असलेलं इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध आता पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. हमास आणि इस्त्रायलने तो प्रस्ताव स्वीकारला. हमास शांतता शिखर परिषदेत जगभरातील नेत्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या असीम मुनीर आणि शरीफ यांचे कौतुक केले. तर ट्रम्प यांनी  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता कौतुक केले. 

भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं

इजिप्तमध्ये झालेल्या गाझा शांतता परिषदेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांचे कौतुक केले. या दरम्यान, शाहबाज शरीफ त्यांच्या मागे उभे असताना त्यांनी हे विधान केले. शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान खूप चांगले एकत्र राहू शकतात असा विश्वास व्यक्त केला.

ट्रम्प पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत म्हणाले, "भारत हा एक उत्तम देश आहे. माझे एक खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी खूप चांगले काम केले आहे." यावेळी त्यांनी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शाहबाज शरीफ यांना विचारले, "ठीक आहे?" शरीफ हसले आणि सहमतीने मान हलवली.

भारत- पाकिस्तानमधील युद्ध ट्रम्प यांनी थांबवले- शाहबाज शरीफ

भारत- पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवला, असे शाहबाज शरीफ म्हणाले. शरीफ यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचे श्रेय ट्रम्प यांना दिले. दुसरीकडे भारताने हा दावा फेटाळले आहे.

भारताविरुद्ध वारंवार विष ओकणारे पाकिस्तानी पंतप्रधान, भारत आणि पाकिस्तान एकत्र राहू शकतात या ट्रम्प यांच्या दाव्याशी सहमती दर्शवल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. 

गाझा शांतता शिखर परिषद

गाझा शांतता शिखर परिषद इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित करण्यात आली होती. हे शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाईन शांतता चर्चा आयोजित केली होती. या शिखर परिषदेत २०२३ पासून सुरू असलेला इस्रायल-हमास संघर्ष संपवणे आणि शांतता प्रक्रिया मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Praises Modi, Leaving Pakistan's Sharif Awestruck; Video Goes Viral

Web Summary : At a Gaza peace summit, Trump praised India and Modi, while standing next to Pakistani PM Sharif. Trump expressed optimism about India-Pakistan relations, a claim India disputes. Sharif credited Trump for easing tensions.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी