शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:35 PM

अब्दुल्ला कर्दाशला आयसिसमध्ये प्रोफेसर या नावाने सुद्धा ओळखले जाते.

वॉशिंग्टनः  'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराने खात्मा केला. त्यानंतर आता त्याच्या उत्तराधिकाऱ्यालाही ठार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अबू बक्र अल-बगदादीच्या नंबर एकच्या उत्तराधिकाऱ्यालाही अमेरिकेच्या लष्कराने ठार केले आहे. बहुधा त्याने अव्वल स्थान मिळवले असते. आता तो ठार झाला आहे, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी खात्मा करण्यात आलेल्या अबू बक्र अल-बगदादी याचा उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अबू बक्र अल-बगदादी याचा उत्तराधिकारी म्हणून अब्दुल्ला कर्दाश ऊर्फ हाजी अब्दुल्ला अल अफरी याचे नाव समोर आले होते. अब्दुल्ला कर्दाशला आयसिसमध्ये प्रोफेसर या नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच, असे सांगण्यात येते की, अब्दुल्ला कर्दाश हा आयसिसच्या सर्व कामांवर लक्ष ठेवून होता आणि त्याला काही खास निर्णय घेण्याचा अधिकारही होता.  

दरम्यान, अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे. या वृत्ताला दुजोरा देत डोनाल्ड ट्रम्प म्हटले होते की, "काल रात्री अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता."

एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.

बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प