शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 21:07 IST

जगातील इतर देश पुन्हा एकदा अमेरिकेचा आदर करू लागतील, असाही व्यक्त केला विश्वास

Donald Trump, US Presidential Elections 2024: जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, पण आम्ही जगभरात शांतता, स्थैर्य आणि सलोखा नांदावी यासाठी प्रयत्न करत आहोत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले. "अमेरिकेत आमचे सरकार आल्यावर जगातील इतर देश पुन्हा एकदा आपला आदर करू लागतील. कोणताही देश आपल्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. आपल्या सीमा पूर्णपणे सुरक्षित राहतील," असेही ट्रम्प म्हणाले.

"सध्या सुरु असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय संकटांचा सामना जगाने याआधी क्वचितच केला असावा. युरोप, मध्य पूर्वमध्ये युद्ध पेटले आहे. तैवान, कोरिया, फिलीपिन्स आणि संपूर्ण आशियामध्ये संघर्षाचा धोका आहे. व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यास हे सर्व चित्र बदलण्याचा मी प्रयत्न करेन. मी रशिया आणि युक्रेनबरोबरच्या भयंकर युद्धांसह सध्याच्या प्रशासनाने निर्माण केलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय संकटाचा शेवट करेन. पण हे घडवून आणण्यासाठी आपण प्रथम आपल्या देशाला असक्षम नेतृत्वापासून वाचवलं पाहिजे,"

"जगातील प्रत्येक देशांना त्यांचे ओलिस ठेवलेले नागरिक सुखरूप परत हवे आहेत. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना परत पाठवावे, अन्यथा संघटनांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. इस्रायलच्या आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसारखा एक प्रकार अमेरिकेत तयार केला जाईल. त्यात ज्या त्रुटी आहेत त्यावरही काम केले जाईल," असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका