शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आदेश? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 9:21 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एकेकाळी वॉटरगेट कांड उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारे अमेरिकन पत्रकार बॉब उडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये हा गौप्यस्फोट केला आहे. खळबळजनक दाव्यांमुळे हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.  या पुस्तकामधून ट्रम्प यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जोरदार टीका करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद  यांना जीवे मारण्याचे आदेश आपल्या संरक्षण सचिवांना दिले होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी असद यांच्यासाठी अपमानजनक शब्दांचा वापर केला होता, असा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणावेळी संरक्षण सचीव जेम्स मॅटीस यांनी आम्ही असे करू शकत नाही. आम्हाला संपूर्ण विचार करून पावले उचलावी लागतील, असे सांगितल्याचा उल्लेखही पुस्तकात आहेत. दरम्यान, व्हाइट हाऊसने हे पुस्तक काल्पनिक गोष्टींनी भरलेले असून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका