डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:26 IST2025-11-03T16:24:56+5:302025-11-03T16:26:46+5:30

अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही.

Donald Trump named China in nuclear testing; Now the dragon gave a direct answer! He said... | डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच काही देश अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला. यात त्यांनी चीन आणि रशिया हे देश जमिनीखाली गुप्त पद्धतीने अण्वस्त्र चाचणी घेत असल्याचे ट्रम्प म्हणाले. यावर आता थेट चीनची प्रतिकिया समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढला आहे. इतकंच नाही तर, हा दावा फेटाळून लावताना "आम्ही एक जबाबदार अणु संपन्न देश आहोत", असे चीनने म्हटले आहे. 

चीनने काय म्हटले?

एएफपीच्या वृत्तानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या दाव्यांना उत्तर देताना स्पष्ट केले की, चीन एक जबाबदार अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहे. बीजिंगने नेहमीच स्व-संरक्षणात्मक अण्वस्त्र धोरण कायम ठेवले आहे आणि अण्वस्त्र चाचणी थांबवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे कठोरपणे पालन केले आहे.

ट्रम्प यांचा नेमका दावा काय?

अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका हा एकमेव देश आहे जो सध्या अणुचाचणी करत नाही. "आम्ही एकमेव देश आहोत, जो चाचणी करत नाही आणि मला चाचणी न करणारा एकमेव देश बनायचे नाही," असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी अणुचाचण्या करणाऱ्या देशांमध्ये उत्तर कोरिया आणि पाकिस्तानचे देखील नाव घेतले.

अमेरिकेकडे जगाला १५० वेळा नष्ट करण्याची क्षमता: ट्रम्प

या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दलही मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि त्यांच्याकडे जगाला १५० वेळा उडवून देण्याइतकी अण्वस्त्रे आहेत.

"आपल्याकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि मला वाटते की आपण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबद्दल काहीतरी केले पाहिजे. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोघांशीही यावर चर्चा केली आहे," असे ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे जागतिक राजकारणात अणुचाचण्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने मात्र 'जबाबदार राष्ट्र' म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Web Title : ट्रंप के परमाणु परीक्षण के दावे को चीन ने नकारा, जिम्मेदार परमाणु रुख की पुष्टि की

Web Summary : चीन ने ट्रंप के गुप्त परमाणु परीक्षण करने के दावे का खंडन किया। उन्होंने एक जिम्मेदार परमाणु शक्ति होने, आत्मरक्षात्मक नीतियों और परीक्षण प्रतिबंध प्रतिबद्धताओं का पालन करने का दावा किया। ट्रंप ने दावा किया कि अमेरिका एकमात्र देश है जो परीक्षण नहीं कर रहा है, जिसके पास दुनिया को 150 बार नष्ट करने के लिए पर्याप्त परमाणु हथियार हैं।

Web Title : China Denies Trump's Nuclear Testing Claims, Affirms Responsible Nuclear Stance

Web Summary : China refuted Trump's claim of conducting secret nuclear tests. They asserted being a responsible nuclear power, adhering to self-defensive policies and test ban commitments. Trump claimed the US is the only country not testing, possessing enough nukes to destroy the world 150 times.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.