शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:38 IST

इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत...!

अमेरिकेतील सामान्य जनतेला बऱ्याच दिवसांनंतर महागाईपासून दिलासा मिळाला होता. मात्र त्यांचा हा आंनंद फार काळ टिकेल असे दिसत नाही. तेथील अर्थव्यवस्थेल पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, आता तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती आधीच ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. ज्या मार्गानेत जगातील २० टक्के एढ्या कच्च्या तेलाचा पुरवठा होतो.

इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत -जानेवारी महिन्यापासून अमेरिकेत तेलाचे दर ८० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलेले नाहीत. ऑगस्ट २०२४ पासून ते साधारणपणे ६० ते ७५ डॉलर प्रति बॅरलदरम्यान आहेत. तेलाच्या किमती कमी असल्याने, देशातील अनेक भागांत पेट्रोलचे दर ३ डॉलर प्रति गॅलनच्या खाली आले आहेत. यामुळे महागाईने त्रस्त ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, १३ जून रोजी इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत.

तेलाच्या किमती भविष्यात कोणत्या दिशेला जातील, हे इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासंदर्भात काय निर्णय घेतो, यावर अवलंबून असेल. खरे तर, हा एक महत्त्वाचा व्यापार मार्ग आहे. ज्याद्वारे जगातील सुमारे २०% कच्च्या तेलाचा व्यापार चालतो. दरम्यान, आपल्या देशाकडे अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक पर्याय आहेत, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते. यातच, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या एका प्रमुख सल्लागाराने आधीच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचे आवाहन केले आहे.

...तर इराणवरील लष्करी हल्ल्यांची शक्यता आणखी वाढेल -तज्ज्ञांच्या मते, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाचा तेल पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला, तर त्यावरील लष्करी हल्ल्यांची शक्यता आणखी वाढेल. इराण, पर्शियन आखातातील तेल आणि वायू प्रक्रिया आणि निर्यात करण्यासाठी बांधलेल्या पायाभूत सुविधांवर देखील हल्ला करू शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण करणे. इराणला प्रत्यक्षात ती भीती निर्माण करावी लागेल.

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणCrude Oilखनिज तेलIsraelइस्रायलwarयुद्ध