शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अमेरिकेतल्या फर्स्ट लेडीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन बायकांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:33 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत. अमेरिकेची 'फर्स्ट लेडी'  बनण्यासाठी ट्रम्प यांच्या दोन्ही बायकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प या संपूर्ण जगभरात अमेरिकेची 'फर्स्ट लेडी' म्हणून परिचित आहेत. परंतु या वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे. 

ट्रम्प यांची पहिली बायको इवाना यांनी फर्स्ट लेडी या पदावर दावा केला आहे. 'रेजिंग ट्रम्प' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्या एका टेलिव्हिजन शोमध्ये आल्या होत्या. त्या म्हणाल्या, माझ्याकडे व्हाइट हाऊसचा नंबर असूनही, मी तिकडे फोन करू शकत नाही. कारण तिथे ट्रम्प यांची दुसरी बायको मेलानिया आहे. माझ्या फोनमुळं मेलानियाला असुरक्षितता वाटू नये, असं मला वाटतं. कारण तसंही ट्रम्प यांची मीच पहिली पत्नी आहे, असं त्या गमतीशीरपणे  म्हणाल्या.मात्र इवानाची ही मस्करी मेलानिया यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे. मेलानिया यांना अमेरिकेची 'फर्स्ट लेडी' होण्याचा दर्जा मिळाला असून, ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. फक्त लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठीच त्यांनी असे विधान केले आहे, असं मेलानियाच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशम म्हणाल्यात.दरम्यान, इवानाने तिच्या या पुस्तकात ट्रम्प यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 68 वर्षीय इवाना ट्रम्प या व्यवसायाने उद्योजिका व मॉडेल आहेत. 1977मध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याशी विवाह केला. परंतु 1992मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला.  'रेजिंग ट्रम्प' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या असता त्या म्हणाल्या, ट्रम्प आणि मी ब-याचदा संपर्कात असतो. दोन आठवड्यानंतर आम्ही एकमेकांना आवर्जून फोन करतो, असं इवानानं या पुस्तकात लिहिलं आहे. ट्रम्प यांच्याकडून काडीमोड घेण्यासाठी इवाना यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प