इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत इराणसोबत युद्धविराम हवा आहे. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स इराणचा संघर्ष सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की, त्यांनी व्हान्स यांना वैयक्तिकरित्या सूचना द्यायला सांगितले आहे की, जर अमेरिकेच्या त्यांनी अटी मान्य केल्या, यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे, तर अमेरिका युद्धविराम करण्याची आपली तयारी कळवावी. आशा आहे की व्हान्स किमान काही अटी मनवतील, असेही ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, व्हान्स यांनी एक कडक संदेश दिला की, ट्रम्प आता अधीर होत आहेत आणि त्यांनी इशारा दिला आहे की, जर इराणने करार केला नाही, तर त्याच्या पायाभूत सुविधांवर दबाव वाढवला जाईल. जोपर्यंत इराण करार करत नाही तोपर्यंत हे सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी काही दिवसापूर्वी इराणच्या संदर्भात मध्यस्थांशी चर्चा केली आहे. इराणने युद्धविरामाची मागणी केली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. यावेळी त्यांनी जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही, अशी अट ठेवली होती.
ट्रम्प यांनी लिहिले की, पेझेश्कियान यांनी नुकतीच अमेरिकेकडे युद्धविरामाची मागणी केली आहे. "जेव्हा होर्मुझ खुला, स्वतंत्र आणि सुरक्षित होईल, तेव्हाच आम्ही त्यावर विचार करू. तोपर्यंत, आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू. इराणी माध्यमांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देत, ट्रम्प यांचा दावा खोटा आणि निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावला.
Web Summary : Trump seeks Iran ceasefire, tasking Vance to negotiate terms, including reopening the Strait of Hormuz. Iran denies requesting a ceasefire. Trump warns of infrastructure pressure if Iran doesn't agree.
Web Summary : ट्रम्प ईरान के साथ युद्धविराम चाहते हैं, व Vance को होर्मुज जलडमरूमध्य को फिर से खोलने सहित शर्तों पर बातचीत करने का कार्य सौंपा। ईरान ने युद्धविराम का अनुरोध करने से इनकार किया। ट्रम्प ने ईरान के सहमत न होने पर बुनियादी ढांचे पर दबाव की चेतावनी दी।