इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांचे वरिष्ठ सल्लागार जवाद लारीजानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. "जेव्हा ट्रम्प त्यांच्या मार-ए-लागो या आलिशान घरात उन्ह घेत असतील, तेव्हा त्यांना गोळी लागू शकते," असे लारीजानी यांनी म्हटले आहे.
इराणमधील एका इंटरनॅशनल वेबसाइटनुसार, ते म्हणाले, "ते (डोनाल्ड ट्रम्प) जेव्हा पोटावर उन्हात झोपलेले असतील, तेव्हा एक छोटेसे ड्रोन त्यांच्यावर हल्ला करू शकते. हे फारच सोपे आहे." महत्वाचे म्हणजे, लारीजानी हे अयातुल्ला खामेनेई यांचे अत्यंत जवळचे माणले जातात.
‘ब्लड पॅक्ट’ वेबसाइट जमाकरतेय निधी - ‘ब्लड पॅक्ट’ नावाचा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, खामेनेई यांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात 'बदला' घेण्यासाठी फंड जमा करत असतानाच, लारीजानी यांचे हे विधान आले आहे. वेबसाइटने दावा केला आहे की, आतापर्यंत त्यांनी 27 मिलियन डॉलरहून अधिक रक्कम जमा केली आहे. त्यांचे लक्ष्य 100 मिलियन डॉलरचे आहे. संबंधित वेबसाइटवर प्रकाशित एका निवेदनात म्हणण्यात आले आहे की, 'जे अल्लाहते शत्रू आणि खामेनेई यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्यांचा न्याय करतील, त्यांना बक्षीस दिले जाईल."
पश्चात्य दुतावासांबाहेर निदर्शन करण्याचे आवाहन -इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी संबंधित फार्स न्यूज एजन्सीने या मोहीमेच्या सुरुवातीची पुष्टी केली आहे. तसेच, धार्मिक समूहांना पश्चात्य देशांचे दुतावास आणि शहरांच्या केंद्र स्थानी निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात 'मोहेरेबेह' सारखा इस्लामी कायदा लागू करण्यात यावा. इराणी कायद्यात ‘मोहेरेबेह’ अर्थात ‘अल्लाहविरोधात युद्ध’ एक गंभीर गुन्हा असून याची शिक्षा मृत्यू आहे.
इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान, अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनसोबत बोलताना म्हणाले, हा ‘फतवा’ ना सरकारचा आहे, ना खामेनेई यांचा. मात्र, खामेनेई यांच्या आधीन असलेल्या, ‘कायहान’ वृत्तपत्राने हे विधान फेटाळत, 'हे शैक्षणिक मत नाही, तर धर्माचे रक्षण करण्यासाठी धार्मिक आदेश आह. भविष्यात कुणी अशी आग लावण्याचा प्रयत्न केला तर, याचा परिणाम अत्यंत घातक होईल. इस्लामिक रिपब्लिक इस्रायलला रक्तात बुडवू," असे लिहिले आहे.0