शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Confirmed : ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा ठार, ट्रम्प यांनी केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 19:31 IST

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवणारा कुख्यात दहशतवादीओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला आहे. हामजा बिन लादेन ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी दुजोरा दिला आहे.  हामजा बिन लादेन हा 31 जुलै रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर झालेल्या दहशतवादीविरोधी चकमकीत ठार झाला.   

हामजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचे वृत्त सुमारे दीड महिन्यापूर्वी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने दिले होते. मात्र अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने हमजाचा मृत्यू कुठे झाला याची माहिती दिली नव्हती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र आज अखेरीस डोनाल्ड ट्रम्प यांनीच हामजा मारला गेल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजाकडून अमेरिकेवर हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते. त्यामुळे अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केले होते. ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन दहशतवादी संघटनेत नव्याने उभा राहणारा चेहरा होता. जिहादचा युवराज म्हणून प्रसिद्ध असलेला हमजा वारंवार आपल्या राहण्याची ठिकाणे बदलत होता. अनेक वर्षांपासून अमेरिका त्यांच्या शोधात होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया आणि इराण अशा विविध देशात तो फिरत होता. काही दिवसांपूर्वी हमजाचे लग्नही झाले  होते. त्याने ज्या मुलीशी लग्न केलं ती 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अट्टा याची मुलगी आहे.  मे 2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लपून बसलेल्या अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं होतं. अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या मागे क्रूर दहशतवादी लादेनचाच हात होता. यानंतर अमेरिकेने लादेनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्षानंतर ओसामा पाकिस्तानमधील एका घरात राहत असल्याचं समोर आलं होतं. 2 मे 2011 ला ओसामा बिन लादेनचा अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथील त्याच्या घरात घुसून खात्मा केला होता. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी यशस्वीरीत्या पार पाडले होते. 

टॅग्स :terroristदहशतवादीOsama Bin Ladenओसामा बिन लादेनUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प