मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:18 IST2025-09-11T11:17:01+5:302025-09-11T11:18:02+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे.

Donald Trump close aide Charlie Kirk shot dead firing took place during university debate | मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर

मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर

Charlie Kirk Shot Dead: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप टर्निंग पॉईंट यूएसएचे सीईओ आणि सहसंस्थापक चार्ली कर्क यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना उटाह राज्यातील युटाह व्हॅली विद्यापीठात घडली. चार्ली 'द अमेरिकन कमबॅक टूर' कार्यक्रमासाठी येथे आले होते. चार्ली बोलत असतानाच त्यांच्या मानेला गोळी लागली आणि ते खाली कोसळले. या घटनेचा हादरवणारा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'टर्निंग पॉइंट यूएसए' या युवकांच्या गटाचे सह-संस्थापक चार्ली कर्क यांची बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात एका वादविवाद कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चार्ली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खूप जवळचे होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. चार्ली यांच्या मृत्यूनंतर देशातील सर्व राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत.

टर्निंग पॉईंटने आयोजित केलेल्या एका चर्चेत बोलताना कर्क यांच्यावर गोळीबार झाला. कर्क यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे काही लोकांनी कर्क यांच्या विद्यापीठातील कार्यक्रमाला विरोध केला होता. विद्यापीठ प्रशासनाला त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेवर १,००० स्वाक्षऱ्या होत्या. पण गेल्या आठवड्यात विद्यापीठाने स्पष्ट केले  की हा कार्यक्रम रद्द केला जाणार नाही कारण हा भाषण स्वातंत्र्य आणि संवाद स्वातंत्र्याशी संबंधित विषय आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार्ली कर्र एका तंबूखाली माइक धरून बोलत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अचानक त्यांच्या मानेजवळ एक गोळी लागली. त्यामुळे मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि ते खाली पडले. या घटनेनंतर युटा व्हॅली विद्यापीठाचा परिसर बंद करण्यात आला. विद्यापीठाचे प्रवक्ते अॅलन ट्रेनर यांनी सांगितले की, चार्ली यांच्यावर १८० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीतून गोळ्या झाडण्यात आल्या.

दरम्यान, चार्ली जेव्हा सामूहिक गोळीबाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते तेव्हाच त्यांना गोळी लागली.  गेल्या १० वर्षांत किती सामूहिक गोळीबार झाले? असा प्रश्न चार्ली यांना विचारण्यात आला. त्यानंतर लगेचच चार्ली यांच्यावर गोळीबार झाला.
 

Web Title: Donald Trump close aide Charlie Kirk shot dead firing took place during university debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.