शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाटोमध्ये आता अमेरिकेची गरज राहिली नाही; अमेरिकेने दिला मित्रराष्ट्रांना उघड धमकीवजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:17 IST

Donald Trump blasts NATO 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचा नाटो देशांना उघड इशारा. इराण युद्धात लष्करी मदत नाकारल्यामुळे ट्रम्प संतापले. 'आम्हाला तुमची गरज नाही' म्हणत अमेरिकेने मित्रराष्ट्रांना सुनावले.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या चौथ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नाटो' मित्रराष्ट्रांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मियामी येथील एका गुंतवणूक मंचावर बोलताना ट्रम्प यांनी नाटो देशांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "जर तुम्ही आमच्यासाठी उभे राहणार नसाल, तर आम्ही तुमच्या संरक्षणासाठी का उभे राहावे? नाटोला आता अमेरिकेची गरज राहिली नाही." असा रोखठोक प्रश्न विचारत त्यांनी नाटोला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.

"जर नाटो देश संकटाच्या काळात अमेरिकेच्या पाठीशी उभे राहत नसतील, तर अमेरिकेनेही त्यांच्या संरक्षणासाठी उभे राहण्याची गरज नाही," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला. अमेरिका नेहमीच नाटो देशांच्या सुरक्षेसाठी धावून गेली आहे. मात्र, आता इराणविरुद्धच्यायुद्धात या देशांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याने, अमेरिकेनेही त्यांच्यासाठी का उभे राहावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी नाटो देशांकडे लष्करी मदतीची मागणी केली होती. मात्र, युरोपियन देशांनी ही मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जगातील २०% तेलाची वाहतूक करणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' इराणच्या तावडीतून सोडवण्यासाठी ट्रम्प यांनी ब्रिटन, जपान आणि अगदी चीनलाही सैन्य पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकाही देशाने आपले सैन्य पाठवण्याची तयारी दर्शवली नाही. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, "ही ब्रेकिंग न्यूज असू शकते, पण हे सत्य आहे. अमेरिका आता नाटोच्या संरक्षणासाठी बांधिल नाही. आम्हाला त्यांच्याकडून काहीही नकोय."

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांना 'भित्रे' म्हटले होते. अमेरिकेच्या लष्करी पाठिंब्याशिवाय नाटो ही संघटना केवळ एक 'कागदी वाघ' आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. नाटो देशांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इराणवर हल्ला करण्यापूर्वी ट्रम्प यांनी कोणत्याही मित्रराष्ट्राशी चर्चा केली नव्हती. त्यामुळे या युद्धात सामील होण्यास युरोपियन युनियन आणि इतर पाश्चात्य देश टाळाटाळ करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : US Threatens NATO Withdrawal Amid Iran War Disagreement.

Web Summary : Trump threatens to withdraw from NATO due to lack of support in the Iran war. He criticized allies for not assisting, questioning the need for U.S. involvement in NATO if members are unwilling to reciprocate during crises. European nations cited lack of consultation before Iran attack.
टॅग्स :AmericaअमेरिकाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध