शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

Watch: मेलेनियामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांसमोर झाली नाचक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:01 IST

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा जगभरात एक वेगळा दरारा आणि सन्मान आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा परदेश दौ-यावर जातात तेव्हा त्यांचे रेड कार्पेटवर जंगी स्वागत होते.

ठळक मुद्देट्रम्प यांची कित्येकदा परदेश दौ-यावर असताना पत्नीने पंचाईत केली आहे. सोमवारी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया व्हाईट हाऊसमधून ओहायोला चालले होते.

न्यूयॉर्क - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा जगभरात एक वेगळा दरारा आणि सन्मान आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा परदेश दौ-यावर जातात तेव्हा त्यांचे रेड कार्पेटवर जंगी स्वागत होते. पण याच ट्रम्प यांची कित्येकदा परदेश दौ-यावर असताना पत्नीने पंचाईत केली आहे. महत्वाचं म्हणजे त्यावेळी परिस्थिती अशी असते कि, ट्रम्प यांना स्वत:चा रागही व्यक्त करता येत नाही. सर्व काही मूग गिळून सहन करावे लागते. 

सोमवारी मेलेनियाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेण्याचा प्रयत्न झिडकारुन लावला. त्यामुळे सर्वांसमक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाचक्की झाली. ट्रम्प पत्नीचा हात पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मेलेनिया चतुराईने ते टाळते. हे असे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वीही अनेकदा मेलेनियाने ट्रम्प यांचा हात झिडकारला  आहे.  प्रसारमाध्यम लगेच हा क्षण आपल्या कॅमे-यात कैद करतात. ज्याचे फोटो, व्हिडिओ नंतर व्हायरल होतो. 

 

सोमवारी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया व्हाईट हाऊसमधून ओहायोला चालले होते. दोघे अमेरिकेच्या मरीन वन विमानात बसण्यासाठी चाललेले असताना ट्रम्प यांनी मेलेनियाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. मेलेनियाने खांद्यावर पिवळया रंगाचा ओव्हरकोट घेतला होता. तिचे हात त्या कोटच्या आतमध्ये होते. ट्रम्प यांनी हात हातात घेण्याचा प्रयत्न करताच मेलेनियाने त्यांना टाळले. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनियाच्या पाठीवर हात ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 

रोममध्ये ट्रम्प यांची झाली होती पंचाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलेनिया ट्रम्पसोबत रोमला पोहोचले असता विमानाच्या दरवाजात उभं राहून उपस्थितांना हात दाखवत होते. यावेळी विमानाच्या पाय-या उतरताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनिया ट्रम्पच्या हातात हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र मेलेनिया ट्रम्प यांनी केस नीट करण्याच्या बहाण्याने अप्रत्यक्षपणे नकारच देऊन टाकला. आपली पंचाईत झाल्याचं लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हात पत्नीच्या पाठीवर ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. या दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. 

इस्त्रायलमध्येही झाला होता अपमान इस्त्रायल दौ-यावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रेडकार्पेटवरुन चालत असताना त्यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्पचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण मेलेनियाने त्यांचा हात चक्क झटकला होता. नेमके हेच दृश्य कॅमे-याने टिपले आणि मग मेलेनियाने डोनाल्ड ट्रम्प यांचा कसा अपमान केला त्याची चर्चा सुरु झाली होती. बेन गुरीऑन विमानतळावर ही घटना घडली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी विमातळावर आले होते.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका