डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:30 IST2025-08-06T19:30:29+5:302025-08-06T19:30:46+5:30
Donald Trump News: सध्या विविध देशांना टॅरिफ लावण्याची धमकी देत असल्याने चर्चेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव
सध्या विविध देशांना टॅरिफ लावण्याची धमकी देत असल्याने चर्चेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प हे नियमानुसार तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत ही मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेचे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे माझ्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या चळवळीचे उत्तराधिकारी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या उत्तराधिकाऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, २०२८ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माझे सर्वाधिक आवडते उत्तराधिकारी उपराष्ट्राध्यक्ष वेन्स हे आहेत. त्याबरोबरच विद्यमान परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्यासोबत असू शकतात, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, माझ्या उत्तराधिकाऱ्यांबाबत बोलायचं झाल्यास माझे उत्तराधिकारी खूप चांगलं काम करत आहे. तसेच सद्यस्थितीत ते माझे सर्वात आवडते असतील. तसेच मार्को रुबियो हेसुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्यासोबत असू शकतात.