शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:23 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध, विशेषतः भारत आणि चीनविरुद्ध कठोर आर्थिक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

India America Tarriff war, donald trump pm modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाविरुद्ध आपली भूमिका कठोर केली आहे. यावेळी त्यांचे लक्ष्य थेट त्या देशांवर आहे, जे रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना एकाअर्थाने आर्थिक बळ देत आहेत. यात भारत आणि चीन हे दोन बडे देश आघाडीवर आहेत. ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे, की जर पुतिन यांच्यावर खरोखर दबाव आणायचा असेल, तर भारत आणि चीनसारख्या देशांवर १००% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले पाहिजे. या संपूर्ण कारवाईचा उद्देश तेल व्यवसायातून रशियाला मिळणारे उत्पन्न कमकुवत करणे हा आहे. ट्रम्पचा असा विश्वास आहे की जोपर्यंत भारत आणि चीन रशियन कच्चे तेल खरेदी करत राहतील, तोपर्यंत युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक धक्का देणे कठीण आहे.

EU अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, पुतिना यांच्याबद्दलचे विधान ट्रम्प यांनी EU चे निर्बंध दूत डेव्हिड ओ'सुलिवान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान केले. अमेरिकन प्रशासनाने असेही संकेत दिले आहेत की जर युरोपियन युनियनने भारत आणि चीनवर कर वाढवले, ​​तर अमेरिकादेखील या रणनीतीमध्ये त्यांच्यासोबत उभे राहील. युरोपियन युनियनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे म्हणणे आहे की जर EU कारवाई केली, तर आम्हीही पाठिंबा देऊ.

ट्रम्प यांनी यापूर्वीही दिली आहे कर वाढवण्याची धमकी

ट्रम्प यांनी यापूर्वीही भारत आणि चीनविरोधाक कठोर भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे. अलिकडेच अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले. विशेषतः रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे, भारतातील काही उत्पादनांवर अतिरिक्त २५% कर लादण्यात आला, ज्यामुळे एकूण कर ५०% पर्यंत पोहोचला आहे. तसेच आता अमेरिका १००% कर लावण्याची भाषा करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांची नेमकी रणनीति काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

एकीकडे मैत्रीची चर्चा, दुसरीकडे कररूपी हल्ला

एकीकडे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी, मोदी आणि ते कायम चांगले मित्र राहतील असेही म्हटले होते. असे असताना, दुसरीकडे ट्रम्प भारतावर कठोर आर्थिक पावले उचलण्याबद्दल बोलत आहेत. म्हणजेच ट्रम्प भारतासोबतचे संबंध पूर्णपणे बिघडू नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत, पण रशियापासून भारताला दूर ठेवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनAmericaअमेरिकाUSअमेरिकाTaxकर