कुणी माकडं देता का?; कोरोनाच्या लसी विकसित करण्यासाठी संशोधकांना जाणवतोय तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 11:28 AM2021-03-03T11:28:03+5:302021-03-03T11:28:15+5:30

अमेरिकेच्या रॉकविले येथील बायोक्वॉल या कंपनीचे सीइओ मार्क लुईस यांच्यासमोर गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र प्रश्न उभा राहिलाय. त्यांना तातडीने हवी आहेत माकडं आणि काही केल्या त्यांना ती मिळत नाहीयेत. आता तुम्हाला वाटेल, या इतक्या बड्या माणसाला एकाएकी माकडांची गरज का पडली असावी?

Does anyone give a monkey ?; Researchers engaged in vaccine research lack the perception of monkeys | कुणी माकडं देता का?; कोरोनाच्या लसी विकसित करण्यासाठी संशोधकांना जाणवतोय तुटवडा

कुणी माकडं देता का?; कोरोनाच्या लसी विकसित करण्यासाठी संशोधकांना जाणवतोय तुटवडा

Next

कुठल्याही संशोधनात, त्यातही हे संशोधन जर आरोग्यविषयक, औषधांच्या बाबतीतलं असेल तर त्यात प्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.  वेगवेगळ्या औषधांचा माणसांवर काय परिणाम होतो हे तपासण्याच्या आधी  प्राण्यांवर त्याचं टेस्टिंग होतं. माकडं आणि उंदीर हे दोन प्राणी तर यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. अनेक प्रकारचे प्रयोग, चाचण्या याची तपासणी अगोदर प्राण्यांवर होते. त्यांच्यावर जर हे प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाले, तरच  माणसांवर प्रयोग करण्यात येतो. वे

गवेगळ्या लसींच्या संशोधनातही हाच प्रकार अवलंबिला जातो. जगभरात वेगवेगळ्या कंपन्या कोरोना लसीवर अजूनही संशोधन करताहेत, काहींनी आपली लस विकसित करून बाजारातही आणली आहे; पण त्याआधी त्यांनी विविध प्राण्यांवर या लसीची चाचणी घेतली आणि त्यानंतरच माणसांवर त्याची खातरजमा करण्यात आली.पण संशोधकांपुढे आता नवीनच अडचण उभी राहिली आहे : माकडं ! कोरोनाची जागतिक साथ सुरू झाल्यापासून लस-संशोधनाला जुंपलेल्या संशोधकांना सध्या माकडांचा मोठा तुटवडा जाणवतो आहे.

बायोक्वॉल या कंपनीवर आपल्या देशाच्या रिसर्च लॅबसाठी, तसेच मॉडर्ना आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या औषध कंपन्यांना माकडं पुरविण्याची जबाबदारी आहे. लुईस यांचं म्हणणं आहे, ‘कोविडवरील लस बनविण्यात माकडांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनानं जगभरात जसा कहर मांडला, तसा एका विशिष्ट प्रकारच्या माकडांची जगात आणि अमेरिकेतही कमतरता जाणवायला लागली. या माकडांची किंमतही दुपटीपेक्षा जास्त झाली आहे!’

लुईस म्हणतात, ‘एका माकडासाठी तब्बल ७.२५ लाख रुपये मोजायची तयारी ठेवूनही माकडं मिळत नाहीत, त्यामुळे संशोधक फारच अडचणीत आले आहेत. वेळेवर माकडांचा पुरवठा होत नसल्यानं अनेक कंपन्यांना आपलं संशोधन स्थगित करावं लागलं आहे!’
अमेरिकी संशोधकांचं म्हणणं आहे, कोरोना आणि इतरही अनेक प्रकारच्या लसी विकसित करण्यासाठी, त्यांचं परीक्षण करण्यासाठी माकडांचा खूप उपयोग होतो. माकडांची डीएनए आणि प्रतिरक्षा प्रणाली जवळपास माणसांसारखीच असते, त्यामुळे संशोधनात त्यांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. माकडांवर चाचणी घेतल्यानंतरच कोणत्याही लसीची ‘ह्यूमन ट्रायल’ सुरू होते; पण माकडांच्या कमतरतेमुळे ही ट्रायलच जवळपास ठप्प पडली आहे.

संशोधनासाठी माकडं मिळणं दुर्मिळ आणि महाग झाल्यानं एड्स आणि अल्झायमर या आजारांवरील संशोधनही शास्त्रज्ञांना थांबवावं लागलं आहे. या कारणामुळे आता माकडांचा पुरेसा संग्रह आपल्याकडे असावा यासाठी अमेरिकेत चर्चा सुरू झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकार ज्याप्रमाणे तेल आणि अन्नधान्याचा साठा करून ठेवतं, भांडारांमध्ये ते जतन करून ठेवतं, त्याचप्रमाणे आता माकडांचाही संग्रह करून ठेवावा लागेल, जेणेकरून संशोधनाला त्यामुळे प्रतिबंध बसणार नाही, याबाबत अनेकांमध्ये एकमत होत आहे.

अमेरिकेच्या सात केंद्रांमध्ये २५ हजार लॅब मंकीज आहेत. त्यातील सहाशे ते आठशे माकडांचा व्हॅक्सीन ट्रायलसाठी उपयोग केला जात आहे; पण त्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती पाहिजेत त्या मिळणं मात्र मुश्कील झालं आहे. चीनममुळे संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव झाला, पण आता त्यांच्यामुळेच लस विकसित करण्यासाठीही अडचणी येत आहेत. कारण ही विशिष्ट प्रकारची माकडं चीनमध्येच जास्त आहेत.

अमेरिकेत २०१९ मध्ये तर माकडांचा साठ टक्के पुरवठा चीनकडून झाला होता; पण कोरोनानंतर चीननं आपलं धोरण बदललं आहे आणि जंगली जनावरांच्या विक्रीवर प्रतिबंध आणला आहे. ‘लॅब ॲनिमल’चा जगातला सगळ्यात मोठा पुरवठादार चीनच आहे. १९७८ पर्यंत भारताकडूनही माकडांची निर्यात होत होती; परंतु त्यांचा वापर ‘सैन्य परीक्षणा’साठी केला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर भारतानं माकडांची निर्यात बंद केली.

संशोधकांकडून माकडांची देवाणघेवाण!

‘द कॅलिफोर्निया नॅशनल प्रायव्हेट रिसर्च सेंटर’चे व्हॅन रोम्पे सांगतात, माकडं कुठे मिळतील याबाबत दर आठवड्याला अनेक कंपन्या आमच्याकडे चौकशी करतात, पण आम्हाला त्यांना सांगावं लागतं, ‘सॉरी आम्ही तुम्हाला संशोधनासाठी परवानगी देऊ प्रयोगासाठी आपल्याकडच्या माकडांची देवाणघेवाण सुरू केली आहे. वेगवेगळ्या लॅबमध्ये या माकडांना पाठवलं जातं. चीन माकडांची निर्यात पुन्हा केव्हा सुरू करील, याची काहीच शाश्वती नाही. काेरोनानंतर चीन आणि अमेरिका यांचे संबंध ताणल्यामुळे किमान अमेरिकेला तरी चीन आपली माकडं पाठवील याची सध्या खात्री  नाही.

Web Title: Does anyone give a monkey ?; Researchers engaged in vaccine research lack the perception of monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.