भारतीय वंशाचा डॉक्टर आॅस्ट्रेलियातून हद्दपार

By Admin | Updated: August 29, 2014 02:54 IST2014-08-29T02:54:21+5:302014-08-29T02:54:21+5:30

शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत भारतीय वंशाच्या मलेशियन डॉक्टरला आॅस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले आहे

Doctor of Indian descent from Australia | भारतीय वंशाचा डॉक्टर आॅस्ट्रेलियातून हद्दपार

भारतीय वंशाचा डॉक्टर आॅस्ट्रेलियातून हद्दपार

क्वालालम्पूर : शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत भारतीय वंशाच्या मलेशियन डॉक्टरला आॅस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले आहे. सुरेश नायर असे या डॉक्टरचे नाव आहे. नायरने मनुष्यवध आणि कोकेन पुरविल्याप्रकरणी चार वर्षांचा कारावास भोगला आहे. ३१ जुलै रोजी पॅरोलवर सुटका झाल्यानंतर त्याच्या हद्दपारीचे आदेश काढले. नायर याने अधिक मात्रेत कोकेन दिल्यामुळे शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता.
न्यायालयात त्याने याची कबूली दिल्यानंतर त्यास शिक्षा ठोठावण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Doctor of Indian descent from Australia