जागतिक राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हेनेझुएलावर दुसऱ्या लष्करी हल्ल्याची धमकी दिली आहे. नव्या नेतृत्वाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य न केल्यास व्हेनेझुएलाला पुन्हा एकदा लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा ट्रंप यांनी दिला आहे.
शनिवारी अमेरिकन एअरस्ट्राइकनंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आले. या मोठ्या कारवाईनंतर व्हेनेझुएलाच्या लष्कराने आता देशाच्या नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांना मान्यता दिली आहे. लष्कराने स्पष्ट केले आहे की, ते "साम्राज्यवादी हल्ल्याच्या" विरोधात एकत्र असून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. मात्र, ट्रंप यांनी 'योग्य वेळी' निवडणुका घेण्याचे संकेत दिले असले तरी त्याची कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही.
कोलंबियालाही लष्करी कारवाईची धमकीव्हेनेझुएलासोबतच ट्रंप यांनी आता शेजारील देश कोलंबिया विरोधातही दंड थोपटले आहेत. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर गंभीर आरोप केले. कोलंबियामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकेनचे उत्पादन होत असून त्याची तस्करी अमेरिकेत केली जात असल्याचा दावा ट्रंप यांनी केला.
"कोलंबिया हा एक 'आजारी' देश आहे आणि तो एका 'आजारी' माणसाकडून चालवला जात आहे, ज्याला कोकेन विकणे आवडते," असे प्रक्षोभक विधान ट्रंप यांनी केले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की अमेरिका कोलंबियावर लष्करी हल्ला करणार का, तेव्हा त्यांनी अत्यंत सूचकपणे "हे मला आवडेल" असे उत्तर दिले.
दक्षिण अमेरिकेत तणावाचे वातावरणअमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून, आता कोलंबियाला मिळालेल्या धमकीमुळे संपूर्ण लॅटिन अमेरिका प्रदेशात युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Trump threatens Venezuela with military action if demands aren't met. He also accuses Colombia of drug trafficking, hinting at possible intervention. South America faces rising tensions and potential conflict.
Web Summary : ट्रंप ने वेनेजुएला को सैन्य कार्रवाई की धमकी दी, अगर मांगें पूरी नहीं हुईं। उन्होंने कोलंबिया पर नशीली दवाओं की तस्करी का आरोप लगाया, संभावित हस्तक्षेप का संकेत दिया। दक्षिण अमेरिका में तनाव बढ़ रहा है और संभावित संघर्ष है।