टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 07:42 IST2025-08-05T07:41:34+5:302025-08-05T07:42:35+5:30

सामान्य स्थितीत आठवड्यातून एकदा तरी फोनची स्वच्छता आवश्यक.

Do you use your phone in the toilet? So how often do you clean it? Know the dangers in advance! | टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!

टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!

मेलबर्न : सध्या मोबाइल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. आपण तो स्वयंपाकघरात, जेवणाच्या टेबलावर आणि अगदी शौचालयातही वापरतो आहोत. त्यामुळे यावर विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू साचण्याची शक्यता असते. तरीही आपण दिवसभरात सर्वाधिक वेळा हातात घेत असलेला फोन मात्र कधीच स्वच्छ करत नाही. त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी आपण आठवड्यातून किमान एकदा फोनची स्वच्छता करणे आवश्यक आहे. फोनवर टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया सापडले आहेत, त्यामुळे फोनची स्वच्छता गरजेची आहे.  

फोन स्वच्छ करताना...
फोन स्वच्छ करताना चुकीचे उत्पादन वापरल्यास मोबाइलच्या वॉटरप्रूफ सीलिंग, टच सेन्सिटिव्हिटी आणि स्क्रीनवरील कोटिंग यांचे नुकसान होऊ शकते. अनेक कंपन्या ब्लीच, हायड्रोजन पेरॉक्साईड, व्हिनेगर, एअरोसोल स्प्रे, विंडो क्लीनर वापरण्यास मनाई करतात. 

नेमके काय कराल? 
फोन चार्जर आणि कव्हरपासून वेगळा करून घ्या.
चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिल यांसारख्या नाजूक भागासाठी अँटी-स्टॅटिक ब्रश (नायलॉन, हॉर्सहेयर किंवा गोट हेयर) वापरा.
थेट फोनवर द्रव फवारू नका.
टिश्यू पेपर किंवा खरडणारे कपडे वापरू नका.

७०%  आयसोप्रोपिल अल्कोहोलच्या वाइप्स, फायबर कापड वापरा.

किती वेळा स्वच्छ कराल? 
सामान्य स्थितीत आठवड्यातून एकदा तरी फोनची स्वच्छता आवश्यक.
फोन रुग्णालय, सार्वजनिक वाहने, जिम यांसारख्या ठिकाणी घेऊन जात असाल, तर स्वच्छता अधिक वेळा करावी.

२२०० 
पेक्षा अधिक सूक्ष्मजीव (८८२ बॅक्टेरिया, १२२९ विषाणू, ८८ फंगस, 
५ प्रोटिस्ट) फोनवर आढळले आहेत. यामुळे संक्रमण 
होऊ शकते.

फोनवर टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया सापडले आहेत. खाण्यापूर्वी हात धुणे, मोबाइल फोन स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Do you use your phone in the toilet? So how often do you clean it? Know the dangers in advance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.