शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...! फेसबुकची कर्मचाऱ्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:40 IST

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा आयफोन वापरावर बंदी आणली आहे.

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा आयफोन वापरावर बंदी आणली आहे. हे कर्मचारी आता अँड्रॉईडचा मोबाईल वापरत आहेत. हे आदेश खुद्द फेसबुकचा मालक मार्क झकरबर्गने दिले असून अॅपलच्या सीईओनी फेसबुकवर टीका केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

 न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अॅपलच्या सीईओ टीम कूक यांनी MSNBC मध्ये एका मुलाखतीदरम्यान फेसबुकवर टीका केली होती. केम्ब्रिज अॅनालिटीका प्रकरणी कूक यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आम्ही असतो तर अशी परिस्थिती होऊच दिली नसती. खासगी आयुष्यात अॅपल कधीच घुसली नाही. खासगीपणा हा मानवी अधिकार आहे आणि स्वातंत्र्यही. फेसबुक युजर्सच्या माहितीद्वारे पैसा कमावते. अॅपल असे कधीच करत नाही. 

टीम कूक यांच्या या वक्तव्यानंतर  मार्क झकरबर्ग नाराज असून त्यांनी थेट आपल्या कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. अॅपलचा फोन वापरायचा असेल तर नोकरी सोडा, अन्यथा अँड्रॉइडचा फोन वापरण्याची तंबीच त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. तसेच अॅपलपेक्षा अँड्रॉइडवर फेसबुकची अॅप वापरणाऱ्यांची संख्याही जादा असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, या पार्श्वभुमीवर या अमेरिकेच्या दोन मोठ्या कंपन्यांमधील वाद आणखी काही महिने सुरु राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गApple IncअॅपलApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८