America Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे इराण युद्धाबाबत अनेक दावे करत आहेत. परंतु, यातील बहुसंख्य दावे इराणकडून फेटाळले जात आहेत. अमेरिकेने चहुबाजूंनी वेढा देऊनही इराण काही माघार घेण्यास तयार नाही, उलट यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. त्यातच इराण आखाती देशांतील अमेरिकन तळांवर हल्ले करत असल्यामुळे त्या देशांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आखाती देशांनी इराणला नामोहरम करण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळाली आहे. जोपर्यंत इराण गुडघे टेकत नाही, तोपर्यंत हल्ले थांबवू नयेत, असा एक सिक्रेट मेसेज संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवैत यांनी अमेरिकेला पाठवल्याचे वृत्त आहे.
इराणविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव आणण्यास आखाती देशांनी सुरुवात केली आहे. अमेरिकन आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या मते, आखाती देशांचा असा युक्तिवाद आहे की, महिनाभर हवाई हल्ले करूनही इराणची धार्मिक राजवट अद्याप पूर्णपणे खिळखिळी झालेली नाही.
इराणला नामोहरम करण्याची संधी
युद्धाच्या सुरुवातीला पुरेशी माहिती न मिळाल्याने आखाती देश संतापले आहेत. त्यामुळे आता इराणचे नेतृत्व कायमस्वरूपी मोडून काढण्याची ही एक ऐतिहासिक संधी म्हणून ते युद्धाकडे पाहत आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि बहरीन यांनी खाजगी चर्चेत म्हटले आहे की, जोपर्यंत इराणी नेतृत्वात मोठा बदल होत नाही, इराण शरणागती पत्करत नाही, तोपर्यंत अमेरिकेने लष्करी कारवाया थांबवू नयेत. या युद्धात आतापर्यंत ३ हजारहून अधिक लोक मारले गेले असून, युद्ध अधिक तीव्र करायचे की तोडगा काढायचा या द्विधा मनःस्थितीत ट्रम्प असताना आखाती देशांची सदर मागणी पुढे आली आहे.
दरम्यान, आखाती मित्रराष्ट्र कमी-अधिक प्रमाणात युद्धाला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर फोर्स वनमधून पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सौदी अरेबिया जोरदार प्रत्युत्तर देत आहे. कतार प्रत्युत्तर देत आहे. यूएई प्रत्युत्तर देत आहे. कुवैत प्रत्युत्तर देत आहे. बहरीन प्रत्युत्तर देत आहे.
Web Summary : Gulf states secretly urged the US to continue strikes until Iran submits. They believe military action is a chance to cripple Iran's leadership. Trump faces pressure amid escalating conflict, with Gulf allies seemingly supporting continued action.
Web Summary : खाड़ी देशों ने अमेरिका से ईरान के आत्मसमर्पण तक हमले जारी रखने का आग्रह किया। उनका मानना है कि सैन्य कार्रवाई ईरान के नेतृत्व को पंगु बनाने का मौका है। बढ़ते संघर्ष के बीच ट्रंप पर दबाव, खाड़ी सहयोगी कार्रवाई का समर्थन करते दिख रहे हैं।