शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ट्रम्प यांच्या आदेशाने भारतीय कुटुंबियांची ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 4:34 AM

कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी हैदराबादला गेल्यापासून ते फेब्रुवारीपासून डलासमध्ये एकटेच आहेत. ते डाटा अ‍ॅनॅलिटिक्स इंजिनिअर आहेत

वॉशिंग्टन : कोरोनाच्या उद्रेकानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी एच-१ बी व्हिसासह नोकरीसाठी व्हिसा जारी करणे स्थगित केल्याने भारतीयांना कौटुंबिक ताटातूट सहन करण्यासोबत नोकरीची चिंताही सतावत आहे.

कोरोनाने मार्चमध्ये वडिलांचे निधन झाले. कोरोनाची साथ पसरल्याने पत्नी आणि दोन मुलांना डलास येथेच सोडून करण मुरगई भारताकडे रवाना झाले. तीन आठवड्यांपासून त्यांची कुटुंबापासून ताटातूट झाली. व्हिसासंबंधीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने ते कुटुंबापासून दुरावले आहेत. हा कौटुंबिक विरह कधी संपेल? ही चिंता करण मुरगई यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सतावत आहे. करण मुरगई हे एका बहुराष्टÑीय कंपनीसाठी माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन सल्लागार काम करण्यासोबत वडिलांचा नवी दिल्लीतील कारभारही पाहतात. त्यांच्या चार वर्षांच्या मुलीची भूकच नाहीशी झाल्याने तिला झटके येऊ लागले आहेत.

अशीच व्यथा डलास येथील संदीप वुदयागिरी यांची आहे. कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी हैदराबादला गेल्यापासून ते फेब्रुवारीपासून डलासमध्ये एकटेच आहेत. ते डाटा अ‍ॅनॅलिटिक्स इंजिनिअर आहेत. त्यांच्या पत्नी अर्पणा तक्कलपल्ली यांच्याकडे एच-४ व्हिसा आहे. व्हिसाचे नूतनीकरण केल्याशिवाय ती माघारी येऊ शकत नाही. अमेरिकेत काम करणाऱ्यांना अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे शिक्षा केली जात आहे. माझी नोकरीही धोक्यात आहे. एकीकडे राजकीय नेते भारत-अमेरिका मैत्रीची प्रशंसा करतात. तथापि, एकूणच अमेरिकेच्या व्हिसासंदर्भातील निर्णयाने या मैत्रीचा विश्वासघात केल्याचे वाटते, अशा शब्दांत तक्कलपल्ली यांनी खेद व्यक्तकेला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प