शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:32 IST

भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असताना भारत, जपानसारख्या बलाढ्य देशांसमवेत सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनच्या कृतीचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. हाँगकाँगमधील दडपशाहीसोबतच पंतप्रधान लि कचांग व राष्ट्रपती शी जिनिपिंग यांच्यातील मतभेदही उफाळून येत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाने २०२१ पर्यंत चीनमधून गरिबीचे उच्चाटन करण्याची घोषणा दशकभरापूर्वी केली. केवळ दीड वर्षांचा अवधी राहिला असला तरी कोट्यवधी चिनी नागरिकांचे उत्पन्न १ हजार युआनपेक्षा जास्त नसल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी केले. गरिबी हटावचा जिनिपिंग यांचा नारा त्यामुळे फोल ठरल्याचे अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी सूचित केले. चिनी माध्यमांमध्ये याचे फारसे वृत्तांकन आले नसल्याचे परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे म्हणे आहे. चिनी भाषा येत असल्याने सोशल मीडियावरील ही चर्चा या अधिकाºयांच्या नजरेस पडली.

कोरोना प्रसाराचे केंद्र ठरलेल्या वुहान शहरावरच सारा दोष चिनी राज्यकर्त्यांनी टाकला. मात्र आम्ही पूर्वसूचना केंद्र सरकारला दिली होती, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे वृत्त राज्य सरकारच्या अखत्यारित असणाºया वुहानमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याचा प्रतिवाद पीपल्स डेली वृत्तपत्रात केंद्र सरकारमधील अधिकाºयांनी केला होता, याकडे या अधिकाºयाने लक्ष वेधले. पाश्चिमात्य वृत्तपत्रांमधील अहवालानुसार चीनमध्ये प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न सरासरी १० टक्क्यांनी घटले आहे.आजपासून लष्करी अधिकाºयांत चर्चानवी दिल्ली : भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. गलवान खोºयावर दावा सांगण्याचा कांगावा सुरूच असून चीनने आपल्या हद्दीत पाय पसरण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पँगाँग सरोवराच्या परिसरात चीनने मोठे बांधकाम केले. सैनिकांना लपण्यासाठी खंदक खणले. बंकरही तयार केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तीन वेळा चीनचे नाव घेता सूचक इशारा देत युद्धसज्जतेची ग्वाही देशवासीयांना दिली. आशिया खंडात चीनच्या लष्करी सामार्थ्यास भारताने आव्हान दिल्याचा संदेश त्यातून जगभर गेला. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये पाच वेळा लष्करी स्तरावर चर्चा झाली. चीनने स्वत:च्या हद्दीतून अजून मागे जाण्यास सहमती दर्शवली होती. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. चिनी मनसुबा त्यामुळे भारताने हेरला व अत्याधुनिक हत्यारसज्ज जवानांची तुकडी लडाख सीमेवर तैनात केली.अद्याप चीनकडून 'धाडसी' निर्णय घेण्याचे संकेत मिळत नसले तरी पूर्वानुभव म्हणून दगाफटका झाल्यास परतवण्यास भारत सज्ज असल्याचे परराष्ट्र मंत्रायातील अधिकाºयांनी सांगितले. चीनला लष्करी सामार्थ्यासह आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतून धडा शिकवला जाईल, असेही परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. भारत व जपानमध्ये युद्धनौका सराव सुरू झाल्याने चीनला योग्य तो संदेश गेला. फ्रान्स, रशियाने अत्याधुनिक उपकरणे, लढाऊ विमाने, लष्करी गुप्तहेर यंत्रणा (इंटेलिजंस) तंत्रज्ञान देण्यास सहमती दर्शवली.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या