शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:26 IST

America attack on Iran: इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यानंतर न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अमेरिकेसोबत चर्चा सुरु असताना इस्रायलनेइराणवर हल्ला चढविला होता. यानंतर इराणनेइस्रायलला चोख प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच अमेरिकेने देखील आज इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला चढविला आहे. ब्रिटनने यावर इराणने राजनैतिक चर्चेतून मार्ग काढावा असा सल्ला दिला आहे. यावर इराणचे परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका आणि युरोपच्या दुटप्पी वागण्याचे आरोप केले आहेत. 

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आता राजनैतिक चर्चेला काही अर्थ उरला नाही. कुटनीतिचा रस्ता कायम खुला ठेवायचा हे जरी योग्य असले तरी आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे अब्बास अराकची यांनी म्हटले आहे. जेव्हा अमेरिकेसोबत चर्चा सुरु होती तेव्हा इस्रायलने आमच्यावर हल्ला केला. तिथेच कुटनीती संपली. यानंतर जेव्हा आम्ही युरोपिय देशांशी चर्चा करत होतो तेव्हा आता अमेरिकेने हल्ला केला आणि ती प्रक्रिया देखील संपविली आहे, असा आरोप अराकची यांनी केला आहे. 

एवढे सर्व होऊनही आता युरोप कसे काय सांगू शकतो की इराणने चर्चेच्या रस्त्यावर परतावे, असा सवालही अराकची यांनी केला. आम्ही जर चर्चा सोडलीच नाही तर परत कसे येऊ, ती बंद करायचे आम्ही तर ठरविले नाही. आमच्यावरच हल्ले करण्यात आले आहेत, असा आरोप अराकची यांनी केला आहे. 

दरम्यान, इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यानंतर न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  सध्या शहराला कोणताही थेट धोका दिसत नाही परंतू धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे अमेरिकेतील पोलिसांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले चढविले आहेत. यामध्ये इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इराणच्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ८६ लोक जखमी झाले आहेत. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध