दिलीपकुमारचे घर कोसळण्याचा धोका

By Admin | Updated: December 13, 2014 01:42 IST2014-12-13T01:42:08+5:302014-12-13T01:42:08+5:30

बॉलीवूड कलाकार दिलीपकुमार याचे पाकिस्तानातील घर कोसळण्याच्या बेतात आले आहे. हे प्राचीन घर पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून जाहीर केले आहे;

Dilip Kumar's house collapse risk | दिलीपकुमारचे घर कोसळण्याचा धोका

दिलीपकुमारचे घर कोसळण्याचा धोका

पेशावर : बॉलीवूड कलाकार दिलीपकुमार याचे पाकिस्तानातील घर कोसळण्याच्या बेतात आले आहे. हे प्राचीन घर पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून जाहीर केले आहे; पण या घराचे दोन मजले खचले असून, बाकीची इमारतही मोडकळीस आली आहे. 
क्विसीखावनी बाजारच्या जवळ असणा:या खुदादाद येथील रहिवाशांनी सरकारला ही माहिती दिली असून, राष्ट्रीय वारसा असणारी ही इमारत वाचविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. दिलीपकुमार यांची ही मालमत्ता राष्ट्रीय वारसा असल्याची घोषणा गेल्यावर्षी करण्यात आली होती. पेशावरच्या नागरिकांसाठी ही तीन मजली इमारत अभिमानाची बाब आहे. दिलीपकुमार गुरुवारी 92 वर्षाचे झाले आहेत.असून, पाकिस्तान सरकारने त्याला निशान इ इम्तियाज हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Dilip Kumar's house collapse risk